आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Index Fund Costs Are Low, Benefits Are High, The Best Strategy Is To Take Advantage Of The Rise Of Indices Like Sensex

फंडचा फंडा:इंडेक्स फंडचा खर्च कमी, फायदे जास्त, सेन्सेक्ससारख्या निर्देशांक वाढीचा लाभ घेण्याचे धोरण उत्तम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात म्युचुअल फंडात गुंतवणुकीची पद्धत वेगाने बदलत आहे. अॅक्टिव्ह फंड्समध्ये गुंतवणूकदारांचा रस कमी होत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी मॅनेजरची गरज असल्याने खर्च अधिक असतो. दुसरीकडे, पॅसिव्ह योजनांमध्ये फंड मॅनेजरची सक्रिय भूमिका नसते. त्यामुळे खर्च कमी असतो. आता दोन्ही योजनांतील परताव्यांमधील फरक कमी राहिला आहे, त्यामुळे पॅसिव्ह योजनांची लोकप्रियता वाढत आहे. यामुळेच २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पॅसिव्ह फंडाच्या एयूएम मध्ये ५७% वाढ झाली आहे. विशेषत: इंडेक्स फंडात केवळ गुंतवणूकदारांचाच रस वाढला असे नाही, तर म्युचुअल फंड हाऊसही याकडे अधिक लक्ष देत आहेत. इंडेक्स फंडाचा पोर्टफोलिओ सोपा असतो, हे याचे सर्वात मोठे कारण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या स्टॉक एक्स्चेंज इंडेक्समध्ये असणारेच शेअर यामध्ये असतात. उदा. एखाद्या म्युचुअल फंड हाऊसने निफ्टी ५० इंडेक्स फंड लॉंच केला असेल तर त्यात निफ्टीचेच ५० शेअर असतील.

१५ वर्षांपासून म्युचुअल फंडाचा अल्फा म्हणजे बेंचमार्कपेक्षा रिटर्न कमी आहे. दोन तृतीयांश अॅक्टिव्ह फंडांचे रिटर्न टॉप-१०० शेअर्सच्या बेंचमार्कपेक्षा कमी आहेत. अशात इंडेक्स फंड अधिक फायदेशीर ठरतो. याचा खर्च कमी असतो.

या ५ कारणांमुळे फायदेशीर आहे इंडेक्स फंड अनेक शेअर्समध्ये एकत्रित गुंतवणूक जर बीएसई ५०० इंडेक्सला ट्रॅक करणाऱ्यांनी एखाद्या फंडात गुंतवणूक केली तर ती बीएसईच्या टॉप-५०० कंपन्यांमध्ये ती एकत्रित होईल. जर निफ्टी १०० इंडेक्सला ट्रॅक करणाऱ्यांनी फंडात पैसे लावले तर ते प्रत्यक्षात एनएसईच्या टॉप-१०० शेअर्समध्ये एकत्रित गंुतवणूक करत आहेत.

कमी गुंतवणूक खर्चाचा फायदा इंडेक्स फंडाच्या खर्चाचे प्रमाण ०.०२-०.२% असते. म्हणजे तुम्ही अशा फंडात एक लाख रुपये गंुतवले तर यावर फक्त २० -२०० रुपये खर्च होईल. अन्य अॅक्टिव्ह फंडांच्या खर्चाचे प्रमाण ०.५ - १.०% असल्याने यात एक लाख रुपये गुंतवणुकीवर ५००-१००० रुपये खर्च होतील.

धोरणात पारदर्शकता चढ-उताराच्या सध्याच्या काळात गुंतवणूकदारांना परताव्यासह पोर्टफोलिओमध्ये पारदर्शकता हवी असते. इंडेक्स फंडात त्याच कंपन्यांचे शेअर्स सामील करण्याची परवानगी असेल ज्या संबंधित इंडेक्समधे लिस्टेड असतात. त्यामुळे कोणत्या शेअरमध्ये पैसा लावला जात आहे हे गुंतवणूकदारांना कळते.

सेक्टोरल गुंतवणूक सर्व क्षेत्रांचे (सेक्टर) शेअर्स एकत्रितपणे चांगला परतावा देत नाहीत. दोन वर्षे चांगला परतावा देणाऱ्या आयटी कंपन्यांचे शेअर घसरले आहते. दुसरीकडे, एफएमसीजी, ऑटो शेअर सुस्थितीत आहेत. गुंतवणूकदार चांगली शक्यता असलेल्या आवडीच्या सेक्टोरल इंडेक्समध्ये पैसा लावू शकतात.

थीम आधारित गुंतवणूक काही वर्षांपासून क्लाऊड काॅम्प्युटिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, न्यू इकाॅनॉमीज सारख्या थिमॅटिक गुंतवणुकीची चलती आहे. फंड मॅनेजरही असे विषय, थीमवर लक्ष ठेवून असतात, जे भविष्यात मोठी वाढ, स्थैर्य देतील. इंडेक्स फंडात गुंतवणूक अशा थिमॅटिक इनोव्हेशनचा फायदा घेण्याची संधी देते.

बातम्या आणखी आहेत...