आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Benefits From Western China Tensions; 25% Increase In Exports; News And Live Updates

मोठी झेप:पाश्चिमात्य देश-चीनमधील तणावाचा भारताला फायदा; निर्यातीत 25% वाढ; ​​​​​​​चायना+वन धोरणाचा परिणाम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनला मिळणाऱ्या निर्यात ऑर्डर भारताकडे

कोविड-१९ महामारीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात आलेला बदल भारताच्या बाजूने जात आहे. या वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची निर्यात कोविडपूर्व पातळीवर पोहोचली आहे. गेल्या तिमाहीत देशाने ७,०३,५४५ कोटी रुपयांची निर्यात केली. ही २०१९ च्या समान अवधीत झालेल्या ५,६२,८१३ कोटींच्या तुलनेत २५ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ८१% जास्त आहे. यादरम्यान प्री-कोविड पातळीपेक्षा केवळ २.८८% जास्त झाली आहे. चीनच्या नाराजीमुळे युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांनी तेथील आयात घटवली आहे, तर भारत वाढवत आहे.

या वर्षी आतापर्यंत अमेरिकेच्या तुलनेत आयातीतील हिस्सेदारी घटवून २८% राहिली आहे. २०२० च्या या अवधीत ३५% होती. दुसरीकडे, यादरम्यान अमेरिकी आयात बाजारात भारताची हिस्सेदारी ७% वरून वाढून ९.१% झाली. यूएस डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सची ट्रेड बॉडी ओटेक्सनुसार, २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांत भारताची अमेरिकेला वस्त्रोद्योगाची निर्यात वार्षिक ६६.६९% वाढली, दुसरीकडे चीनच्या प्रकरणात ही वाढ केवळ ०.०६% राहिली.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे (फियो) माजी अध्यक्ष शरदकुमार सराफ म्हणाले, गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर चीनला मिळणारी निर्यात ऑर्डर भारतात शिफ्ट झाली आहे. युरोप चीनकडून आयात करू इच्छित नाही. ज्या वस्तू भारताकडे उपलब्ध नाहीत केवळ त्याच वस्तू चीनकडून आयात करत आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन म्हणाले, पाश्चिमात्य देशांच्या चायना+1 धोरणाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे.

आयातीवर लगाम
जून तिमाहीत प्री-कोविड पातळीपेक्षा सव्वापट जास्त झाली भारताची निर्यात, यादरम्यान आयातीत केवळ १०% वाढ नोंदली भारतीय उत्पादने स्वस्त आहेत. यामुळे जे देश चीनकडून आयात करू इच्छित नाही,ते भारताकडे वळत आहेत. व्हिएतनाम व कंबोडियासारखे देशही संधीचा फायदा उचलू इच्छित आहेत. मात्र, मागणी ज्या प्रमाणात निघते ते पाहता पुरवठा त्यांना शक्य नाही. - आर. के. मारू, संचालक, फॉरेन ट्रेड मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग सेंटर

कमोडिटी जून-19 जून-21बदल(%) लोह खनिज 1,508 3,749 148.6 तेल गिरणी 468 810 73.4 केमिकल्स 11,422 19,636 71.9 पेट्रोलियम प्रॉडक्ट्स 18,973 29,588 55.9 तांदूळ 3,564 5,453 53.0 इंजिनिअरिंग सामग्री 45,581 68,294 49.8 सेरेमिक प्रॉडक्ट्स 1662 2149 29.3 इलेक्ट्रॉनिक्स 6,472 7,713 19.2 फार्मास्युटिकल्स 12,752 14,849 16.4 (आकडे कोटी रुपयांत, स्रोत: वाणिज्य मंत्रालय)

वर्षात सुमारे दुप्पट निर्यात
वित्त वर्ष जून एप्रिल-जून
2019-20 1,73,791 5,62,813
2020-21 1,65,899 3,89,016
2021-22 2,39,047 7,03,545

बातम्या आणखी आहेत...