आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • India Can Provide Support To Global Supply Chain, Which Is Hampered By Dependence On China, India Has The Capacity And Skills To Meet US Needs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटात संधी:चीनवर अवलंबित्वामुळे बाधित झालेल्या जागतिक पुरवठा साखळीला भारत देऊ शकतो आधार, भारताकडे अमेरिकेची गरज पूर्ण करण्यासाठी क्षमता आणि कौशल्य

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणू महारोगराईमुळे चीनमधून बाहेर पडण्याची तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी भारत होऊ शकते योग्य ठिकाण
  • २०२० मध्ये भारत-अमेरिका व्यापारी संबंध नव्या उंचीवर पोहोचू शकतात

विजय गोविंदराजन आणि गुंजन बागला |

जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनशी अमेरिकेचे संबंध या दिवसांत वेगाने बदलत आहेत. दोन तृतीयांश अमेरिकन लोक सध्या चीनबद्दल सकारात्मक विचार करत नाहीत, असे एप्रिलमध्ये झालेल्या प्यू सेंटरच्या सर्वेक्षणात समोर आले. अहवालानुसार २००५ पासून चीनमधील अमेरिकेतील ही सर्वात कमी रेटिंग आहे. चीनबद्दल आकर्षण कमी होत असल्याने आता चीनचे स्थान कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आत्ताच समोर आलेले उत्तर म्हणजे भारत. ज्या दिवशी प्यू सेंटरच्या चीनशी संबंधित सर्वेक्षण झाले त्याच दिवशी अमेरिकन सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओमध्ये ५७० कोटी डॉलर (सुमारे ४३.११ हजार कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली. यामुळे रिलायन्स जिओने भारतातील पाच मोठ्या कंपन्यांमध्ये स्थान पटकावले. विशेष म्हणजे जेव्हा ही घोषणा केली गेली तेव्हा कॅलिफोर्निया (जेथे फेसबुकचे मुख्यालय आहे) आणि भारतात दोन्ही ठिकाणी लॉकडाऊन होते. सामान्यत: अशा करारासाठी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना खूप प्रवास करावा लागतो, पण याबाबतीत मुकेश अंबानी यांनी हे काम घरीच बसून पार पाडले.

भारत आणि अमेरिकन कंपन्यांमधील संबंध कोणत्या दिशेने जात आहेत हे यावरून सिद्ध होते. २०२० मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार नवीन उच्चांकावर जाईल, असा आमचा विश्वास आहे. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि दुसरे म्हणजे ट्रम्प प्रशासनाने चीनवर लादलेले टॅरिफ.

कोरोना महामारीमुळे अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलियामधील कंपन्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या पुरवठा साखळी टीमला पूर्णपणे चीनवर अवलंबून राहण्याऐवजी पर्याय शोधण्याचे निर्देश देत आहेत.

आता केवळ मसाले, कपडे व दागिने बनवत नाही भारत

अमेरिकन व्यापारी भारताकडे मसाले, कापड, दागिने आणि टेक्स्टाइल, हँडक्राफ्ट विकणारा देश म्हणून पाहत आले आहेत. भारत अजूनही या अब्जावधी डॉलर्सच्या वस्तू अमेरिकेत निर्यात करतो. याखेरीज भारत आता व्हॅल्यू चेनमध्ये आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर मरीन वनचे केबिनचे काम भारतात होते. अमेरिकेच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या फोर्ड इको स्पोर्टची निर्मिती भारतातील चेन्नई येथे केली जाते. नासाच्या जेट लॅबोरेटरीने सर्वात महागड्या इमेजिंग उपग्रह एनआयएसएआरसाठी भारताच्या इस्रोशी करार केला आहे. हे भारतात तयार होईल आणि प्रक्षेपणही भारतातून होईल.

भारतच का?

२०१९ मध्ये अमेरिकेने चीनकडून ४५,२०० कोटी डॉलर्सची (सुमारे ३४.२ लाख कोटी रुपये) आयात केली. भारत, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील आणि थायलंड हे पाच देश आहेत जे कमी खर्चात उत्पादन करण्यास सक्षम आहेत, ज्यांचा जीडीपीही जास्त आहे. या देशांमधील भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सचे उपसचिव (दक्षिण आशिया) यांनी व्हर्च्युअल बैठकीत सांगितले की, येत्या काही वर्षांत भारतात औद्योगिक घडामोडी बघायला मिळू शकतात.

बातम्या आणखी आहेत...