आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलन मस्क यांनी अखेर भारतात ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनचा प्लॅन लॉंच करण्याची टाइमलाइन जाहीर केली आहे. एका यूजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्विटर कंपनीचे मालक एलन मस्क म्हणाले की, ट्विटर ब्लू सबस्क्रिशन सेवा भारतात एका महिन्यात लॉंच करण्याचे नियोजन करित आहे.
सद्या ब्लू टिक प्लॅन 4 देशांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यामध्ये यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. यासाठी 4.99 डॉलर आकारण्यात आले. मात्र, आता हे नवीन फीचर्ससह जगभरात लॉंच केले जाणार आहे.
आता फक्त ब्लू यूजर्सलाच मिळेल ब्लू टिक बॅज
एलन मस्क यांनी गेल्या आठवड्यात खुलासा केला होता की, आता फक्त ट्विटर ब्ल्यू टिक वापरकर्त्यांना त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक व्हेरिफाइड बॅज मिळेल. तर सद्या व्हेरिफाईड झालेल्या यूजर्सला देखील ट्विटर ब्लू टिक सेवेसाठी पैसे द्यावे लागतील आणि सदस्यता घ्यावी लागेल.तथापि, या वापरकर्त्यांना सशुल्क सदस्यत्वावर स्विच करण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळू शकतो. जर त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन घेतले नाही. तर त्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकले जाईल.
भारतात 200 रुपये आकारले जाऊ शकतात
ट्विटरच्या नवीन सबस्क्रिप्शनची किंमत अमेरिकेत 7.99 डॉलर असेल. iOS वापरकर्त्यांना या सेवेसाठी अॅपमध्ये नवीन अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्याचवेळी, भारतात त्याची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र, ही किंमत देशाच्या पर्चेजिंग शक्तीवर अवलंबून असेल. असे मस्क यांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत भारतात या सेवेसाठी दरमहा 200 रुपये आकारले जातील, अशी चर्चा केली जात आहे.
ब्लू टिक मिळाल्यास यूजर्सला फायदा काय
पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना ५ प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत.
याशिवाय स्पॅमला आळा घालण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. जर प्रकाशकांचा ट्विटर सोबत करार असेल तर ब्लू टिक सदस्य सशुल्क लेख देखील विनामूल्य वाचू शकतात.
ब्लू टिक सेवा हा मुद्दा खालील चार मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया-
1. आता ब्लू टिक कसे मिळवायचे?
आता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कंपनीच्या विहित प्रक्रियेनंतर वापरकर्त्यांना ब्लू टिक दिली जाते. कोणत्याही वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर टिक आहे याचा अर्थ ते खाते सत्यापित केले आहे.
2. आता काय बदल होणार आहे?
ट्विटरवर ब्लू टिकसाठी वापरकर्त्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. मात्र, सशुल्क सेवा कधी लागू होणार याची तारीख अद्याप ठरलेली नाही. भारतात यासाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतील.
3. फी सर्व देशांमध्ये समान असेल का?
इलॉन मस्क म्हणाले की, प्रत्येक देशानुसार शुल्क बदलू शकते. फी त्या देशाची क्रयशक्ती आणि क्षमता यावर अवलंबून असेल. भारतात ते किती असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
4. सेलिब्रिटींच्या प्रोफाइलवर एक विशेष दुय्यम टॅग असेल
जे फेमस व्यक्ती आहेत म्हणजे राजकारणी आणि अभिनेते यासारख्या सेलिब्रिटींना प्रोफाइलवर दुय्यम टॅग मिळेल. हा दुय्यम टॅग सध्या फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या ट्विटर अकाऊंटवर पाहिले जाऊ शकते. युनायटेड स्टेट्स सरकारी अधिकारी त्याच्या नावाखाली दुय्यम टॅग म्हणून लिहिलेले आहे. सध्या हा टॅग भारतात उपलब्ध नाही.
सद्या ही सेवा फक्त या देशांमध्ये उपलब्ध
सद्या, लेबल चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, बेलारूस, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, क्युबा, इक्वेडोर, इजिप्त, होंडुरास, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, सर्बिया, स्पेन, थायलंड, तुर्की, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.