आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वाढ सुरू : २०१९ मध्ये सर्वाधिक एफडीआय मिळवणारा नववा देश झाला भारत, गेल्या २१ वर्षांपासून २१ %जास्त

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचा मोठा बाजार देशासाठी गुंतवणूक आकर्षित करत राहील
  • संयुक्त राष्ट्राच्या व्यापार युनिटच्या अहवालानुसार, भारतात कोरोनानंतर सकारात्मक विकास दर राहील
  • भारत २०१८ मध्ये एफडीआय प्रकरणात १२ वा होता

भारत २०१९ मध्ये सर्वात जास्त प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक(एफडीआय) प्राप्त करणारा नववा मोठा देश राहिला. या दरम्यान देशात ५१०० कोटी डॉलर(३.८८ लाख कोटी रु.)चे एफडीआय आले. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यापार शाखेने आपल्या अहवालात ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार व विकास परिषदेने अहवालात नमूद केले की, भारतात कोरोनानंतर कमकुवत मात्र, सकारात्मक आर्थिक विकास दर राहील. भारताचा मोठा बाजार देशासाठी गुंतवणूक आकर्षित करत राहील. संस्थेच्या जागतिक गुंतवणूक अहवाल २०२० नुसार, २०१८ मध्ये भारताला ४२०० कोटी डॉलर(३.१९ लाख कोटी रु.)ची एफडीआय मिळाली होती. त्यावेळी भारत एफडीआय मिळवणाऱ्यांत १२ वा होता. विकसनशील आशिया क्षेत्रात भारत जास्त एफडीआय प्राप्त करणाऱ्या अव्वल पाच देशांत समाविष्ट राहिला आहे.

१५५ भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, १.२५ लाख नोकऱ्यांची निर्मिती १५५ भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत २२ अब्ज डॉलर(सुमारे १.६ लाख कोटी) रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे अमेरिकेत १.२५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज(सीआयआय)ने आपल्या एका अहवालात ही बाब सांगितली. इंडियन रुट्स, अमेरिकन सॉइल २०२० नावाने जारी केलेल्या अहवालात नमूद केले की, सर्वेक्षणात समाविष्ट १५५ भारतीय कंपन्या वॉशिंग्टन, डीसी आणि प्युर्टाे रिकोसह अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांत व्यवसाय करतात. अमेरिकी सीनेटर जॉन कोर्निन यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकींनी अमेरिकेतील संस्कृती, अर्थशास्त्र आणि वैज्ञानिकतेत मोठे योगदान दिले आहे. आम्ही त्यांचे कठीण परिश्रम आणि नवोन्मेषाचा सन्मान करताे. त्यामुळे तुम्ही हे चांगले काम करत राहा. अहवालानुसार, भारतीय कंपन्यांनी टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि मॅसाच्युसेट्समध्ये सर्वात जास्त प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक(एफडीआय) केली आहे.

कोरोना संकटामुळे २०२० मध्ये जगभरात विदेशी गुंतवणुकीत ४० टक्क्यांपर्यंत घसरणीचा अंदाज अहवालानुसार, कोरोनामुळे २०२० मध्ये जगात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत ४० टक्क्यांपर्यंत घसरण येण्याची शक्यता आहे. ही घसरण २०१९ मध्ये झालेल्या १.५४ ट्रिलियन डॉलरच्या प्रवाहाच्या तुलनेत येऊ शकते. तसे झाल्यास २००५ नंतर पहिला परिणाम असा होईल की, जगाच्या देशांत एफडीआय पहिल्यांदा एक ट्रिलियन डॉलरच्या आकड्यापेक्षा खाली येईल. कोरोना विषाणू महारोगराईमुळे आशियाच्या विकसनशील देशांत एफडीआय प्रवाह २०२० मध्ये ४५ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...