आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चीनहून अमेरिकेला हाेणाऱ्या निर्यातीतील घसरणीचा फायदा उचलण्यात भारत अयशस्वी; व्हिएतनाम आणि तैवानची बाजी

अनिर्बाण नाग | नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डच मल्टिनॅशनल फायनान्शियल कंपनी राबोबँकच्या अहवालात समाेर आली माहिती

चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्धाचा भारताने जास्त फायदा उचलला नाही. अमेरिकेने चीनचा आयात माल कमी केला, मात्र भारत ही घट पूर्ण करू शकला नाही. भारतात मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारतासारख्या योजना सुरू असताना अशी स्थिती आहे. एवढेच नव्हे तर भारत आणि अमेरिकेत या वेळी राजकीय संंबंध खूप बळकट आहेत. डच मल्टिनॅशनल फायनान्शियल कंपनी राबोबँकने आपल्या ताज्या अहवालात ही बाब सांगितले आहे. राबोबँकच्या अहवालानुसार, व्यापार युद्धामुळे चीनहून अमेरिकेत होणारी निर्यात घटली आहे.

अमेरिकेसोबत चांगले संबंध असल्याने आणि स्थानिक निर्मिती बेस बळकट करण्याच्या प्रयत्नानंतरही याचा जास्त फायदा मिळाला नाही. अमेरिकी चीनला वगळून अन्य देशांत आपली पुरवठा साखळी शिफ्ट करत होती तेव्हाही भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत किरकोळ वाढ नोंदली आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये चीनमध्ये तयार सामग्रीचा अमेरिकेतील आयात १७% घटली. राबोबँकला आढळले की, अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुद्धाचा सर्वात जास्त फायदा व्हिएतनाम, मेक्सिको आणि तैवानला झाला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या एकूण आयातीत व्हिएतनामची हिस्सेदारी २०%, मेक्सिकोची ६१% आणि तैवानची १०% हाेती. भारताची हिस्सेदारी केवळ ३% आहे. बँकेच्या अंदाजानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जागतिक पुरवठा साखळीत आणखी जास्त बदल दिसेल.

या कारणांमुळे मागे राहिला भारत

अर्थतज्ञ राल्फ वान मेचेलन आणि मिचेल वान डेर वेन यांनी सांगितले की, व्यापारयुद्धामुळे चीनहून जो सर्वात जास्त व्यवसाय बाहेर आला आहे तो संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचा आहे. याचा मॅन्युफॅक्चरिंग बेस भारतात खूप छोटा आहे. या कारणामुळे भारत याचा फायदा उचलू शकला नाही. याशिवाय भारताचे अमेरिकेपासूनचे भौगोलिक अंतरही चीन, तैवान, व्हिएतनाम आणि मेक्सिको देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. अंतराचा हा घटकही भारताविरुद्ध जातो.

बातम्या आणखी आहेत...