आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India First Full Foldable Smartphone Launch; Techno | Phantom V Fold | Foldable Smartphone

लॉचिंग:भारतात लॉंच झाला पहिला फूल फोल्डेबल स्मार्टफोन; 'टेक्नो फॅंटम व्ही फोल्ड'मध्ये 7.85 इंच 2K+ डिस्प्ले, जाणून घ्या- किंमत आणि फीचर्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक कंपनी टेक्नो (TECNO) ने मंगळवारी म्हणजे 11 एप्रिल रोजी फोल्डेबल 5G स्मार्टफोन 'Phantom V Fold' भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन भारतातील पहिला फूल फोल्ड मोबाईल असल्याचा कंपनीचा दावा आहे. टेक्नोने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2023 इव्हेंटमध्ये या मोबाईलचे सादरीकरण केले.

कंपनीने हा स्टायलिश आणि अ‌ॅडव्हान्स डिझाईनचा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरियंटमध्ये लॉंच केला. भारतात, त्याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये आहे. खरेदीदार 12 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइटवरून फोन खरेदी करू शकतील. बँकेच्या ऑफरनंतर तुम्ही 77,777 हजार रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकाल. हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायात मिळेल.

टेक्नो फँटम व्ही फोल्ड स्मार्टफोनचे फीचर्स....

डिस्प्ले : Tecno Phantom V Fold स्मार्टफोन दोन डिस्प्लेसह येतो. यात LTPO AMOLED पॅनेलवर बनवलेली 7.85-इंचाची मुख्य स्क्रीन आहे. याचे रिझोल्यूशन 2296 x 2000 पिक्सेल 2K+ आहे. फोनच्या बाहेरील बाजूस 1080 x 2550 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.42-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. T दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतात.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर : 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनवलेले मीडियाटेक डायमेंसिटी 9000+ ऑक्टाकोर प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे. जो 3.2 GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर काम करतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Mali G710 GPU उपलब्ध आहे. Android 13 ऑपरेटिंग सिस्टमसह, हा फोन हाय ऑपरेटिंग सिस्टम फोल्ड आवृत्तीवर काम करतो.

स्टोरेज : टेक्नोचा हा फोल्डेबल फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करतो. फोनमध्ये 12GB रॅम आहे. जी हाय कार्यक्षमतेसाठी 21GB पर्यंत वाढवता येते. त्याचवेळी, स्टोरेजसाठी 256GB आणि 512GB पर्याय उपलब्ध आहेत, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येतात.

कॅमेरा : टेक्नो फोनमध्ये अल्ट्रा क्लिअर 5 लेन्स फोटोग्राफी सिस्टीम वापरण्यात आली आहे. फोन फोल्ड केल्यानंतर बाहेरील स्क्रीनवर 32MP फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. त्याचवेळी, फोन उघडल्यानंतर एक 16MP फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 50MP पोर्ट्रेट टेली फोटो लेन्स आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे.

बॅटरी आणि चार्जर : पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5000mAh बॅटरी आहे.

फँटम व्ही फोल्डमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरिओ स्पीकर आणि यूएसबी टाइप-सी ऑडिओ देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G SA/NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS/GLONASS, USB Type-C आणि NFC यांचा समावेश आहे.