आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Has The Opportunity To Replace China In Manufacturing, But May Take Up To Five Years

मॅन्युफॅक्चरिंग:भारताकडे चीनची जागा घेण्याची संधी, मात्र लागू शकतो पाच वर्षांचा अवधी 

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • २०१९ : देशात दुप्पट विदेशी गुंतवणूक

काेराेना विषाणूच्या महामारीने जगासाेबत भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला अाहे. असे असले तरी सध्याच्या स्थितीतही भारतासाठी काही चांगल्या संधी समाेर येत अाहेत. जगातील बहुतांश देश मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून अाहेत. काेराेना महामारीमुळे चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे काम ठप्प झाले अाहे व स्मार्टफाेनपासून उत्पादनांची साखळी तुटली अाहे. याच कारणास्तव मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनचा पर्याय शाेधला जात अाहे.

२०१९ : देशात दुप्पट विदेशी गुंतवणूक 

यूबीएसच्या अहवालानुसार, भारत अशा कंपन्यांसाठी उत्कृष्ट सिद्ध हाेत अाहे, ज्या चीनबाहेर पडण्याचा प्रयत्न करत अाहेत. २०१९ मध्ये देशात थेट विदेशी गुंतवणूकही दुप्पट झाली.काेराेनात हा ट्रेंडही राहिल्यास भारत स्मार्टफाेन,गॅजेटसाेबत अन्न, अाैषध उद्याेगासाठी अावडीचे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर ठरू शकते.

पाच वर्षांचा अवधी लागू शकताे

भारत त्वरित चीनची जागा घेईल. मात्र, सरकारने प्रयत्न केल्यास येत्या पाच वर्षांत हे शक्य अाहे. यादरम्यान भारतास अापल्या मनुष्यबळास जास्त सक्षम अाणि कुशल करावे लागेल. काेराेना महामारी भारतात किती नुकसान पाेहाेचवते अाणि त्यातून बाहेर पडण्यास भारताला किती अवधी लागेल हे पाहावे लागेल.

स्मार्टफाेनच्या विक्रीवर परिणाम

काउंटर पाॅइंट रिसर्चनुसार, मार्चमध्ये भारतात स्मार्टफाेन पुरवठा वार्षिक अाधारावर २७ टक्के कमी झाला अाहे. एप्रिलमध्ये ६० टक्के घसरणीचा अंदाज अाहे. दुसरीकडे, २०२० मध्ये १५.३ काेटी स्मार्टफाेनचा अंदाज अाहे. हा २०१९ च्या अाकड्या(१५.८ काेटी)पेक्षा कमी अाहे. 

बातम्या आणखी आहेत...