आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Inc. Prefers To Work From The Office; Some Companies Prepare For Both Home And Office News And Updates

वर्क फ्रॉम होम:इंडिया इंक कंपनीची ऑफीसमधून काम करण्यास पसंती; काही कंपन्या घर आणि ऑफीस दोन्हीसाठी तयार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशार्तंगत कंपन्या विदेशी कंपन्यासारख्या उत्साहित नाही.

देशातील ६०% मोठ्या आण‍ि ७०% मध्यम आकाराच्या कंपन्याकडून कोरोनानंतर वर्क फ्रॉम होमला नकार कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच लहान मोठ्या कंपन्यांतील कर्मचार्यांना घरुनच वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. जास्तीतजास्त कंपन्यांना वाटते की, आपले कर्मचारी कोरोनापूर्व काळासारखे ऑफीसमध्ये येऊन काम करायला हवे. एका सर्वेनुसार, देशातील ७०% कंपन्या आपल्या कर्मचार्यांना कोरोनानंतरच्या काळात घरून काम करु देण्याच्या मानसिकतेत नाही. त्यातच ५९% कंपन्यां रिमोट वर्किंगला सामान्य मानण्यास तयार नाही आहेत. इनडीड या एप्लॉयमेंट वेबसाईटने देश आण‍ि विदेशातील लहान मोठ्या कंपन्यांतील १२०० एंप्लॉयी आण‍ि ६०० एंप्लॉयरचा सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे.

देशार्तंगत कंपन्या विदेशी कंपन्यासारख्या उत्साहित नाही.
या सर्वेच्या माहितीनुसार, इनडीड या कंपनीने देशातील आण‍ि विदेशातील ६७% मोठ्या आण‍ि ७०% मध्यम कंपन्यातील कर्मचार्यांचा सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, देशार्तंगतील कंपन्या ह्या विदेशातील कंपन्या एवढ्या उत्साहित नसून रिमोट वर्किंग चालू ठेवण्याच्या तयारीत नाही आहे. परंतु, विदेशातील कंपन्या याबाबतीत अधिक उदरमतवादी दिसत आहे.

विकसनशील देशातील कंपन्यांचे दृष्टीकोन पाहणे उत्सुकतेचे ठरेल
इनडीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार यांनी सांगितले की, कोरोना काळात रिमोट वर्कमुळे कंपन्यांना आपल्या काम करण्याच्या प्रकियेत बदल करण्यास भाग पाडले आहे. यामुळे उच्च आण‍ि नीमस्तर कर्मचार्यांमध्ये बरोबरी आणण्याचे काम केले आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील कंपन्या रिमोट वर्किंगला घेऊन काय दृष्टीकोन ठेवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असे ते पुढे बोलताना म्हणाले.

९% लोक घरुनच काम करायला तयार
सर्वेनुसार देशातील ४६% कर्मचार्यांना वाटते की, जे लोक कोरोना महामारीमुळे घरुन काम करत आहे. ते शेवटपर्यंत घरी राहू शकत नाही. त्यामुळे ५०% कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांना ऑफीसमधून काम मिळाले तर ते तेथे जाऊन काम करण्यास तयार आहे. फक्त ९% लोकांना वाटत की, त्यांना शेवटपर्यंत घरुन काम करावे. यात ६०% महिला असून २९% पुरुषांचा समावेश आहे.

वर्क फ्रॉम होमसाठी ३२% एंप्लॉयी पगार कपातीसाठी तयार
घरुनच काम करायला ३२% लोकांची पसंती असून ते त्यातील पगारकपातीसाठी तयार आहेत. परंतु, ८८% उच्चपदस्थ कर्मचारी असलेल्या लोकांना घरुन काम करायला आवडत असून पगारकपातीसाठी त्यांचा विरोध आहे. यामध्ये ६०% महिला आण‍ि ४२% पुरुषांचा समावेश आहे. हे त्या सर्वेमधून समोर आले आहे.

काही कंपन्यां देणार घर आाण‍ि ऑफीसमधून काम करण्यास परवानगी
देशातील काही कंपन्या आता आपल्या कर्मचार्यांना ऑफीसमधून काम करण्यासाठी बोलावत आहे. यातील जास्तीतजास्त कंपन्या ब्लेंडेड म्हणजेच फ्लेक्सिबल वर्किंग मोडवर काम करण्यासाठी परवानगी देण्यास तयार आहेत. यामध्ये त्यांना घर आण‍ि ऑफीसमधून काम करता येऊ शकते. दुसर्या मॉडेलमध्ये अर्धे कर्मचारी ऑफीसमधून आण‍ि अर्धे कर्मचार्यांना घरुनच काम करायला लावू शकतात.

केपीएमजी इंडिया हायब्रीड मॉडेलवर काम करू शकते
केपीएमजी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून वैद्यनाथन यांनी सांगितले की, आम्ही १०% कर्मचार्यांना कार्यालयात बोलवत असून जेव्हापर्यंत सर्वांना लसीकरण आण‍ि चोविस तास वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही हाच पर्यायवर काम करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...