आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्लोबल स्पेस मार्केटमध्ये भारतासाठी संधी वाढताहेत. अवकाशातून मिळणाऱ्या हायस्पीड इंटरनेटच्या मागणीमुळे उपग्रह प्रक्षेपणाचा व्यवसाय वाढला. अमेरिका व युरोप यांनी चीन व रशियापासून अंतर राखल्याचा फायदाही भारताला होत आहे. यामुळेच भारत फक्त अंतराळाच्या क्षेत्रातच चीनला टक्कर देत नाही तर एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचा विश्वासार्ह पर्याय म्हणूनही पुढे येत आहे.
भारताला मोठे यश, मात्र इतर देशांत अडचणी { भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो)ने २६ मार्चला ब्रिटिश कंपनी वनवेबसाठी ३६ उपग्रह प्रक्षेपित केले. { इस्रोमुळे वनवेबला जगाच्या प्रत्येक भागात उपग्रह इंटरनेट उपलब्ध करण्याची योजना पूर्ण करण्यात मदत झाली. { फ्रान्सच्या एरियनस्पेसला त्यांच्या नव्या राॅकेटचा वापर करण्यासाठी पुरेसा प्लॅटफॉर्म तयार करण्यात खूप अडचणी आल्या. { ब्रिटनच्या व्हर्जिन ऑर्बिट होल्डिंग्जने जानेवारीत प्रक्षेपणातील अपयशानंतर गेल्या आठवड्यात मोहीम बंद करण्याची घोषणा केली आहे.
उपग्रह प्रक्षेपणात भारत यामुळे पुढे… } स्पेसएक्स, चीन आणि रशियापासून अंतर बाळगणाऱ्या देशांकडे मोजकेच पर्याय आहेत. } स्पेसएक्स व्यग्र आणि महाग आहे, चीनमुळे अडचण असल्याने भारत एकमेव पर्याय आहे. } चीन उत्तर अमेरिकेसोबत काम करू शकत नाही, तर अमेरिकेतून बहुतांश मागणी होते. } उपग्रह ऑपरेटर्सना चीनी रॉकेट पसंत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.