आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इष्टापत्ती:रशियाच्या कच्च्या तेलावरून सध्या सुरू असलेल्या घडामोडीत भारतच खरा विजेता

ह्यूस्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपियन युनियनच्या देशांमध्ये कच्च्या तेलावर रशियाचे वाढते निर्बंध ऊर्जेच्या बाबतीत नवीन “वर्ल्ड ऑर्डर’साठी जागा निर्माण करत आहेत. याचा फायदा चीन आणि सौदी अरेबियाला होणार असला तरी यात भारत खरा विजेता ठरत आहे.

नवीन परिस्थितीत, कच्च्या तेलाच्या प्रमुख आयातदारांपैकी चीन आणि भारत तेल उत्पादक देशांशी वाटाघाटी करण्याच्या चांगल्या स्थितीत आहेत. अशा देशांना भारत आणि चीनसारखी मोठी बाजारपेठ गमवायची नाही. याशिवाय भारताला दुहेरी फायदा होऊ शकतो. क्रूडच्या वाढत्या किमतींमध्ये भारत रशियाकडून अधिक सवलतीच्या दरात तेलाची आयात वाढवत आहे. भारत सध्या रशियाकडून दररोज सुमारे ६ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करत आहे. एक वर्षापूर्वी रशिया भारताला दररोज केवळ ९० हजार बॅरल क्रूडचा पुरवठा करत होता. याचा अर्थ केवळ एका वर्षात भारताने रशियन तेलाची आयात ६.५ पटीने वाढवली आहे.दुसरीकडे, भारत युरोपसाठी रिफायनिंग हबदेखील बनू शकतो. वास्तविक, युरोप रशियाकडून कच्च्या तेलाऐवजी तयार डिझेल-पेट्रोल विकत घेत असे. ही पुरवठा साखळी बंद झाल्यानंतर युरोपीय देश भारताकडे वळत आहेत.

भारताला याचा फायदा असा
1. रशियाच्या एकाकीपणामुळे भारत तेथून अत्यंत स्वस्त क्रूड खरेदी करण्यास सक्षम आहे.
2. हे स्वस्त क्रूड रिफाइन करून ते युरोपला पाठवल्याने चांगले मार्जिन मिळत आहे.
3. युरोपची रिफायनिंग क्षमता खूपच मर्यादित आहे, भारत युरोपचे रिफायनिंग हब बनत आहे.

भारतासाठी मोठी संधी
ऊर्जेच्या बाबतीत युक्रेनच्या संकटात भारत एक विजेता म्हणून उदयास आला आहे. किमान युरोपियन निर्बंधांचा रशियाकडून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम होत नाही तोपर्यंत भारताची स्थिती सकारात्मक राहील.
- हेलिमा क्रॉफ्ट, धाेरणप्रमुख (कमोडिटी) आरबीसी

बातम्या आणखी आहेत...