• Home
  • Business
  • India is the safest country with new opportunities; ... then India will be an alternative to China in the manufacturing sector

परिवर्तनाच्या पुढे विजय / भारत सर्वाधिक सुरक्षित अन् नव्या संधी असणारा देश; ... तर भारत उत्पादन क्षेत्रात चीनचा पर्याय ठरेल

  • भारतीयांच्या सेवाभावाची जगभरात चर्चा, विदेशात राहणाऱ्या भारतीयांना देशात परतायचेय

दिव्य मराठी

May 22,2020 08:04:00 AM IST

नवी दिल्ली. जगातील सर्व आर्थिक शक्तींच्या तुलनेत भारताने ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना केला त्याने विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनात देशाबद्दल गर्वाची भावना वाढली आहे. संकटाच्या या काळात आपल्या देशात गुंतवणूक कशी वाढवावी यावर गंभीरपणे विचार करत आहेत. त्यांना वाटते की, आज कोरोनाच्या काळात भारत सर्वाधिक सुरक्षित आणि संधी असलेला देश आहे. देशात औद्योगिक धोरणात मूलभूत बदल केल्यास आगामी काळात अनेक क्षेत्रांचा हब बनू शकतो. या जाणून घेऊ विदेशात राहणाऱ्या भारतीयांचे मत काय आहे...


उद्योगांना कमी दराने व्याज मिळाल्यास परतणार

अमेरिकेत लॉकडाऊननंतर माझ्यासारखे अनेक आयटी व्यावसायिक परतण्याचा विचार करत आहेत. कोरोनाने येथील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. २ कोटी नोकऱ्या गेल्या. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर येथे बाहेरील नोकरदारांसाठी पासपोर्टच्या धोरणात मोठे बदल झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात एच-वन पासपोर्टधारकांच्या नोकऱ्या गेल्या. अटीनुसार जर त्यांना दहा दिवसांत दुसरी नोकरी मिळाली नाही तर सर्वांना अमेरिका सोडावी लागेल. मात्र, कोरोनामुळे प्रवास बंद असल्याने त्यांना थोडभ् सवलत मिळाली आहे. भारताच्या तुलनेत येथे आरोग्य सुविधा महाग आहेत. केवळ कोरोना चाचणी मोफत आहे. पॉझिटिव्ह आढळल्यास उपचाराचा पूर्ण खर्च स्वत:ला करावा लागतो. यामुळे बहुतांशी जण देशात परतू इच्छितात. येथे आयात अधिक असल्याने आपत्तीत प्रत्येक नागरिकाला फटका बसतो. भारतात उद्योग व नोकरदारांना कायदेशीर संरक्षण आहे. २००८-०९ अाणि २०११ च्या मंदीत लाखो भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तेव्हा मोठ्या संख्येने भारतीय परतले होते. अमेरिकेत नोकरीची हमी नाही. बेकारांची जबाबदारी अमेरिका घेत नाही. भारतात हे शक्य आहे.
- बालेन्द्र कुंडू तांदूळ व्यावसायिक, न्यूजर्सी मूळ- रोहतक, हरियाणा


... तर भारत उत्पादन क्षेत्रात चीनचा पर्याय ठरेल

भारताने कोरोनावर लवकर मात केली तर हा देश विदेशी गुंतवणुकीचे मोठे केंद्र होईल. आज कंपन्यांचे चीनऐवजी भारताकडे लक्ष आहे. विशेषत: अमेरिकेसाठी भारत मोठे हब ठरू शकतो. कारण अमेरिका मोठा आयातदार आहे. भारताची प्रतिमा सध्या अमेरिकेत चांगली आहे. सध्या आम्ही भारतात परतू शकत नाहीत, पण भविष्यात काही सांगू शकत नाही. अमेरिकेत सध्या सुमारे ४१ लाख भारतीय अाहेत. अनेकांना बदल करायचा आहे, विशेषत: आयटी सेक्टरशी संबंधित लोकांना परतायचे आहे. मात्र, मुलांमुळे ते शक्य नाही. त्यांची मुले येथे रुळली आहेत. एक मात्र नक्की की येथेच राहूनही अनेक जण भारतात गुंतवणुकीची योजना आखत आहेत. आमच्या वर्तुळात कोरोनाची चर्चा होते तेव्हा भारताचा उल्लेख नक्की होतो. प्रत्येक जण कोरोनाबाबत भारताचे कौतुक करतो. मात्र, भारताचे औद्योगिक धोरण ही समस्या आहे. कोणी, कुठेही संप करायला बसतो आणि व्यावसायिकाला कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अमेरिकेबाबत बोलायचे झाले तर येथे घरी बसूनच एका तासात आम्ही नवी कंपनी उभी करून उद्योग सुरू करतो. चीनमध्येही कंपनी सुरू करायची प्रक्रिया खूप सोपी आहे.
- अभिजीत देशपांडे, प्रोडक्शन मॅनेजर, इपीकॉर सॉफ्टवेअर, कॅलिफोर्निया मूळ- लातूर, महाराष्ट्र

X