आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India May Set Up Rs 55,000 Crore Semiconductor Plant, Talks With Taiwanese Government Begin

तैपेई:भारतात 55 हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्लँट स्थापन होऊ शकतो, तैवान सरकारसोबत वाटाघाटी सुरू

तैपेई / श्रुती श्रीवास्तव/ मियाओजुंग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि तैवान यांच्यात एका कराराबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे एका वर्षाच्या आत भारतात सुमारे ५५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लँट स्थापन केला जाऊ शकतो. या प्लँटच्या माध्यमातून ५जी उपकरणांपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत चिपचा पुरवठा होईल. भारतात हा प्लँट स्थापन करण्यासाठी उपयुक्त ठिकाणाचा शोध घेतला जात आहे, जिथे जमीन, कामगार आणि पाण्याची उपलब्धता असावी. प्रकरणाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि तैवानी अधिकाऱ्यांत शुल्क कपातीसंदर्भात चर्चा सुरू आहे. तैवानचे अधिकारी सेमीकंडक्टरच्या निर्मितीत उपयोगात येणाऱ्या एक डझनहून अधिक उत्पादनांसाठी शुल्कात सूट मागत आहेत. यासोबत भारत सरकारकडून या प्लँटमध्ये ५०% भांडवली खर्चाच्या मदतीशिवाय करात सूट आणि अन्य प्रोत्साहनही देण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेची सर्व सेमीकंडक्टर आयात करतो. भारतात सध्या १.७७ लाख कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टरची मागणी आहे. ही २०२५ मध्ये वाढून जवळपास ७.४ लाख कोटी होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही आठवड्यांत ही चर्चा जास्त वेगाने पुढे गेली आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चिपच्या पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्वॉड बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला हाेता. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच अमेरिकी दौऱ्यावर क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो ई अमोनसोबत भारतात गुंतवणुकीबाबत चर्चा केली हाेती. क्वालकॉम सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर निर्मितीसोबत वायरलेस तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा देते.

हाही धोका : सेमीकंडक्टर निर्मितीत लाखो गॅलन पाणी लागते
सेमीकंडक्टर निर्मितीत मोठ्या प्रमाणात अल्ट्रा-प्युअर पाणी लागते. जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पाेरेशन(टीएसएमसी) एका दिवसात १.५६ लाख टनापेक्षा जास्त पाण्याचा वापर करते. जगभरात चिप टंचाईचे मुख्य कारण तैवानमध्ये दुष्काळ पडणे हे आहे. तैवानमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीमुळेच दुष्काळ पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...