आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भारत-पे आपल्या कर्मचाऱ्यांचे 20 टक्के वेतन वाढवणार; व्यापारी नेटवर्क दुप्पट करण्यासोबत नवीन भरती करण्याचीही तयारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कठीण काळ येतो आणि जातो, घाबरण्याऐवजी भविष्यासाठी तयारी केली जावी
  • महारोगराई पसरल्यानंतर अनेक कंपन्यांनी वेतन कपातीचा निर्णय घेतला

कोरोना विषाणूच्या महारोगराईमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे कंपन्या नोकऱ्यांत कपात करत आहेत. स्टार्टअप्सपासून बहुराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करत आहेत. अशा स्थितीत डिजिटल पेमेंट स्टार्टअप भारत-पेने आपल्या कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे. बिझनेस इनसायडरनुसार, भारत-पेचे सीईओ आणि सहसंस्थापक अशनीर ग्रोवर यांनी सांगितले की, अशा पद्धतीचा कठीण काळ येतो आणि जातो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. उलट स्वत:ला मोठ्या कामासाठी आणि व्यवसायासाठी तयार करण्याची गरज आहे. ग्रोवर म्हणाले, कोरोना संकट नेहमीसाठी राहणार नाही. कालानुरुप देश आणि जग या कठीण परिस्थितीतून बाहेर निघेल. त्यामुळे सर्वांनी धैर्य कायम राखण्याची गरज आहे.

वेतनवाढीसह भारत पे जास्तीत जास्त लोकांना कर्ज वाटपासाठी व्यापारी नेटवर्क दुप्पट करत आहे. त्यासाठी कंपनी आणि लोकांची भरती करेल. भारत पे गंुतवणुकीसाठी १२ % व्याजावर पियर टू पियर कर्ज देते. कोरोनाच्या नुकसानीतून सावरण्यासाठी कंपनीने आणखी १४० कोटी रु जारी केले आहेत.

कोरोना रुग्णास ट्रॅक करण्यासाठी गुगल-अॅपलची हातमिळवणी

तंत्रज्ञानातील दोन मोठे दिग्गज गुगल आणि अॅपलने कोरोना रुग्णाना ट्रॅक करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्या आपल्या स्मार्टफोन प्लॅटफॉर्मवर असे तंत्रज्ञान विकसित करत आहेत, ज्याद्वारे युजरला कोरोना संसर्गित संपर्कात आल्यावर त्वरीत अलर्ट मिळेल. मेच्या मध्यापर्यंत हे तंत्रज्ञान येण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानाने वायरलेस पद्धतीने अॅपच्या माध्यमातून कोरोना रुग्णाची माहिती मिळेल. एखादा कोरोना रुग्ण तुमच्याजवळ असेल तर आरोग्य विभागाच्या माहितीच्या आधारावर तुम्हाला अलर्ट मिळेल. जगभरात ९५ टक्के स्मार्टफोन किंवा अँड्रायड आहेत किंवा आयओएस, म्हणजे एकतर गुगल किंवा आयफोनच्या प्लॅटफाॅर्मवर चालतात.

बातम्या आणखी आहेत...