आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सरासरीपेक्षा 37.10 एमबीपीएस कमी:मोबाइल डाऊनलोडमध्ये 40 रँक वाढूनही भारत 71वा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात देशात सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीड ५०.२६ मेगाबाइट्स प्रतिसेकंद (एमबीपीएस) राहिली. ती ऑक्टोबरमध्ये २७.१३ एमबीपीएसच्या स्पीडच्या जवळपास दुप्पट आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा केवळ २०.७१ एमबीपीएस होता. त्याबरोबरच भारत सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीडबाबतीत ४० पायऱ्यांची उडी घेऊन ७१ व्या रँकवर पोहोचला आहे.

नेटवर्क इंटेलिजन्स कंपनी ऊकलाच्या अहवालानुसार ३२३.१० एमबीपीएसच्या सरासरी स्पीडसह संयुक्त अरब अमिरात(यूएई) मोबाइल डाउनलोड स्पीडमध्ये पहिल्या स्थानी राहिला. सोमवारी आलेल्या या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये जगभरात सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीड ८७.३६ एमबीपीएस राहिली.

मोबाइल डाउनलोड स्पीडमध्ये भारताची स्थिती रँक देश स्पीड 1. यूएई 323.10 2. कतार 310.17 3. द. कोरिया 245.58 4. बल्गेरिया 225.17 5. कुवैत 208.96 6. डेन्मार्क 205.47 7. नॉर्वे 202.86 8. बहरीन 187.21 9. चीन 185.70 71. भारत 50.26 संपूर्ण विश्व 87.36 (स्पीड: मेगाबाइट्स प्रतिसेकंद, स्रोत: ऊकला)

ब्रॉडबँड स्पीडमध्येही भारत दोन स्थानांनी गेला वर ऊकलाच्या मते, नोव्हेंबरमध्ये देशात फिक्स्ड ब्राॅडबँडची सरासरी स्पीड वाढून ७७.७३ एमबीपीएस झाली. ऑक्टोबरमध्ये हा आकडा ७५.९४ एमबीपीएस होता. यातही भारत दोन स्थानांनी वाढून ८१ व्या स्थानी आला आहे. एमबीपीएस स्पीडसह मोनॅको याबाबतीत पहिल्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...