आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी दर 4 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर:एप्रिलमध्ये वाढून 8.11% वर गेला, शहरांत गावांपेक्षा वाईट स्थिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. सेंटर फॉर मॉनिटोरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार एप्रिलमध्ये बेरोजगारी दर वाढून 8.11 टक्क्यांवर गेला आहे. मार्चमध्ये बेरोजगारी दर 7.80 टक्के होता. फेब्रुवारीमध्ये तो 7.45 टक्के होता.

एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारी दर 8.51 टक्क्यांवरून 9.81 टक्क्यांवर गेला. तथापि, एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारी दरात किंचित घट झाली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी दर 7.34 टक्के झाला आहे. मार्चमध्ये हा दर 7.47 टक्के होता.

यावर्षी आतापर्यंत बेरोजगारीची स्थिती

महिनाबेरोजगारी दर
जानेवारी7.14%
फेब्रुवारी7.45%
मार्च7.80%
एप्रिल8.11%

कसा ठरतो बेरोजगारी दर?

डिसेंबरमध्ये बेरोजगारी दर 8.11 टक्के राहिला म्हणजेच काम करण्यासाठी तयार असणाऱ्या 1000 पैकी 81 जणांना काम मिळाले नाही. सीएमआयईकडून दर महिन्याला 15 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे सर्व्हेक्षण केले जाते. यातून रोजगाराची स्थिती जाणून घेतली जाते. याच्या निष्कर्षांच्या आधारे अहवाल तयार केला जातो.

बेरोजगारी दरावरून दिसते अर्थव्यवस्थेची स्थिती

सीएमआयईनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य बेरोजगारी दरावरून योग्यरित्या प्रतिबिंबित होते. कारण देशातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक बेरोजगार आहेत, हे यावरून दिसते. रबी पिकाच्या पेरणीच्या सुरूवातीला तेजी दिसू शकते अशी थिंक टँकला आशा आहे. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा चांगली कामगिरी करू शकते असेच यावरून म्हटले जाऊ शकते. यामुळे प्रवासी मजूर शेतांकडे परतू शकतात.