आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोटा भरून काढण्यासाठी:रशियाकडून कमी दराने क्रूड खरेदी करण्याची भारताची इच्छा

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे जगातील अनेक देश रशियाकडून क्रूड खरेदी करण्याचे टाळत आहेत, तर भारत रशियाकडून स्वस्त दरात अधिकाधिक क्रूड खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. ओपेक आणि इतर तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदी करताना होणारा तोटा भरून काढण्यासाठी भारत रशियाकडून मोठी सवलत घेण्याचा विचार करत आहे.

जागतिक स्तरावर, क्रूडच्या किमती सध्या प्रतिबॅरल १०५ डाॅलरच्या आसपास आहेत. परंतु रशियाने प्रतिबॅरल ७० डाॅलरपेक्षा कमी दराने क्रूडचा पुरवठा करावा असे भारताला वाटत आहे. भारतासाठी परकीय चलन वाचवण्याची ही एक चांगली संधी आहे, जे आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक आयात करते. फेब्रुवारीपासून भारतीय कंपन्यांनी रशियाकडून ४ कोटी बॅरलपेक्षा जास्त क्रूड खरेदी केले आहे. हे २०२१ च्या तुलनेत २०% जास्त आहे.

रशियान्े भारताच्या मागणीच्या दरानुसार तेल देण्याचे मान्य केले तर भारतीय तेल कंपन्या महिन्याला १.५ कोटी बॅरल तेल खरेदी
करू शकतात.

कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यात ओपेक अपयशी
महामारीनंतर पुरवठा पूर्ववत करण्यासाठी धडपडणारे तेल उत्पादक देश एप्रिलमध्येदेखील उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरले आहेत. इराकमधून क्रूड उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असली तरी लिबिया आणि नायजेरियासारख्या काही देशांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सौदी अरेबियानेही आपल्या कोट्यानुसार तेलाचे उत्पादन वाढवलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...