आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Will Become Third Largest Economy World In 2030, Report By Morgan Stanley, Latest News And Update 

2030 ला भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था:मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल; 10 वर्षात भारतीय कुटुंबांची संख्या 5 पटीने वाढेल

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवाल सादर झाला आहे. यात म्हटले की, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्र आणि अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि या सर्वांमुळे भारताला अर्थव्यवस्थेत भरभराट होण्याची अपेक्षा आहे. 2030 ला संपणाऱ्या दशकात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

हे भारताचे दशक का?

या अहवालाचे शीर्षक हे भारताचे दशक का ? असे आहे. भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या ट्रेंड आणि धोरणांचा अभ्यास करते. अहवालानुसार, याचा परिणाम म्हणून भारत जागतिक अर्थव्यवस्थेत सामर्थ्यशाली होवू लागला आहे. आमच्या मते हे विशेष बदल केवळ दशकांमध्येच घडतात. ते सर्व गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी चांगली संधी असते. लोकसंख्याशास्त्र, डिजिटायझेशन, डेकार्बोनायझेशन आणि डिग्लोबालायझेशन हे चार जागतिक ट्रेंड भारताच्या बाजूने जाऊ लागले असल्याचे अहवालाचत म्हटले आहे. अर्थात याला नवीन भारत असे म्हटले जात आहे.

कुटुंबवाढीचा कसा होईल परिणाम?
पुढील दशकात, भारतातील कुटुंबांची संख्या पाच पटीने वाढून 25 दशलक्ष पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. ज्याचे उत्पन्न प्रति वर्ष US $35,000 पेक्षा जास्त असेल. 2031 पर्यंत कौटुंबिक उत्पन्नात वाढ, उपभोगात झालेली वाढ, आणि नंतर ते 2031 पर्यंत, देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, US $ 7.5 ट्रिलियन (US $ 7.5 ट्रिलियन किंवा सुमारे 620 लाख कोटी) दुप्पट होईल. बाजार भांडवलात दरवर्षी 11 टक्क्यांच्या वाढीसह येत्या दशकात 10 ट्रिलियन यूएस डॉलर्स (यूएस 10 ट्रिलियन यूएस डॉलर्स किंवा सुमारे 827 लाख कोटी रुपये) वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 2031 सालापर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न देखील US $ 2,278 वरून US $ 5,242 पर्यंत वाढेल. ज्यामुळे खर्चात वाढ होणे स्वाभाविक असणार आहे.

आधार प्रणाली व त्याचे परिणाम
भारतातील आधार प्रणालीच्या यशाचा संदर्भ देत या अहवालात म्हटले आहे की, सर्व भारतीयांसाठी मूलभूत ओळखपत्र आहे. जे अगदी लहान-मोठ्या व्यवहारांवर किमान खर्चासह प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आधार आणि इंडिया स्टॅक आता सर्वव्यापी बनले आहेत. एका धक्कादायक सुरुवातीनंतर, आणि कायदेशीर आव्हानांसह विविध आव्हानांवर मात केल्यानंतर 1.3 अब्ज लोकांकडे डिजिटल ओळखपत्रामुळे आर्थिक व्यवहार सोपे आणि स्वस्त झाले आहेत. हे सर्व आधार प्रणालीमुळे शक्य झाले आहे. जनकल्याणाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात मदत होते.

GDPत भारताच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा 21% वाढेल

मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवाल सांगण्यात आले की, GDP मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा 2031 पर्यंत 21 टक्क्यांपर्यंत वाढेल. याचा अर्थ उत्पादन संधींमध्ये USD 1 ट्रिलियन (अंदाजे 82.7 लाख कोटी) वाढ होईल. दुसरीकडे, भारताचा जागतिक निर्यात बाजारातील हिस्सा 2031 पर्यंत 4.5 टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे निर्यात संधी 1.2 ट्रिलियन यूएस डॉलर (सुमारे 99 लाख कोटी रुपये) पर्यंत वाढू शकतात. यादरम्यान, म्हणजे, भारताची सेवा निर्यात पुढील दशकात जवळपास तिप्पट होऊन $527 अब्ज (जी 2021 मध्ये $178 अब्ज होती) होईल.

अहवालातील इतर काही मुद्द्यावर नजर टाकूया

  • 2031 पर्यंत ई-कॉमर्सची व्याप्ती 6.5 टक्क्यांवरून 12.3 टक्क्यांपर्यंत दुप्पट होईल.
  • पुढील 10 वर्षांत, भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 650 दशलक्ष वरून 96 दशलक्ष होईल, तर भारतातील ऑनलाईन खरेदीदारांची संख्या 250 दशलक्ष वरून 700 दशलक्ष होईल.
  • 2021 ते 2030 दरम्यान जगातील कार विक्री वाढीमध्ये भारताचा वाटा सुमारे 25 टक्के असेल. 2030 पर्यंत प्रवासी वाहनांच्या विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 30 टक्के असेल.
  • निवासी मालमत्तेच्या बाजारपेठेतील पुढील तेजी 2030 पर्यंत येईल आणि तोपर्यंत भारत 'मेजर इन्फ्लेक्शन पॉइंट' गाठेल - उच्च दरडोई उत्पन्न, सरासरी वय 35 आणि मोठे शहरीकरण होईल.
  • तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील भारताचे कर्मचारी 2021 मधील 51 लाखांवरून 2031 मध्ये 1.22 कोटींवर दुप्पट होतील.
  • भारतातील हेल्थकेअर प्रवेश सध्याच्या 30-40 टक्क्यांवरून 60-70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे 400 दशलक्ष नवीन लोक औपचारिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतील.
बातम्या आणखी आहेत...