आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Will Become World's Third Largest Economy I Indian Economy Latest News And Update 

भारतीय अर्थव्यवस्थेत कायम राहणार तेजी:2029 पर्यंत जर्मनी, जपानला भारत मागे टाकणार, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर गेली आहे. सद्याच्या विकास दरानुसार (जीडीपी) भारत 2027 मध्ये जर्मनीला आणि 2029 मध्ये जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालानुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 13.5% राहिला आहे. या दराने भारत या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची अशीच वाटचाल सुरू राहणार असून येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद विरमानी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, गेल्यावर्षी जगभरातील अर्थव्यवस्थेत भारत सहाव्या स्थानी होता.

भारतीय अर्थव्यवस्था अतिशय झपाट्याने वाढतेय

अर्थतज्ज्ञ विरमानी म्हणाले की, 2022 मध्ये आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू अशी अपेक्षा होती. भारत वेगाने विकसित होत आहे आणि 2028-30 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करित आहेत. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील 10 व्या क्रमांकावर होती. त्यामुळे सातव्या ठिकाणी बदल दिसू शकतो.

अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी पासून खूप मागे नाही

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या मते, भारत आपल्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीपेक्षा मागे नाही. IMF च्या मते, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी या देशाशी भारतीय अर्थव्यवस्थेलील फरक फक्त 854 अब्ज डॉलर आहे.

बातम्या आणखी आहेत...