आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने आपल्या कर्मचाऱ्यांची मॅचमेकिंगची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. खरं तर, कंपनीने जानेवारी 2023 मध्ये मॅट्रिमोनिअल पोर्टल सुरू केले आहे. जेणेकरुन कंपनीत काम करणारे लोक तेथेच काम करणाऱ्या लोकांमधून आपला जीवनसाथी निवडू शकतील. कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी होतानाही दिसत आहे. या सेवेच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी रोजी कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचे लग्न झाले.
पहिल्या जोडप्याने फेब्रुवारीमध्ये लग्न केले
इंडियन ऑइलच्या या नवीन सेवेचे नाव आहे IOCians2gether. या सेवेच्या माध्यमातून कंपनीतील सीमा यादव आणि तरुण बन्सल हे दोन कर्मचारी एकमेकांना भेटले. नुकतेच त्यांचे लग्नही झाले. कंपनीच्या नवीन सेवेद्वारे सीमा आणि तरुण हे लग्न करणारे पहिले जोडपे आहे. लग्नाला आयओसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत माधव वैद्यही उपस्थित होते. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचा फोटोही शेअर केला, जो लोकांना खूप आवडला आहे.
सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर करत श्रीकांत यांनी लिहिले की, तरुण आणि सीमा यांचे मिलन पाहून मी रोमांचित झालो. आमच्या 'IOCians2gether' या प्लॅटफॉर्मद्वारे जीवनसाथी शोधणारे हे पहिले जोडपे आहे. तुम्हाला आयुष्यभर सुखी जीवनासाठी शुभेच्छा.
सोशल मीडियावर यूजर्सनी प्रश्न उपस्थित केले
सीमा आणि तरुण गेल्या पाच वर्षांपासून कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात काम करत आहेत. मॅट्रिमोनिअल पोर्टल सुरू केल्यानंतर त्यांची भेट झाली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात दोघांचे लग्न झाले. मात्र, सोशल मीडियावर काही यूजर्स म्हणत आहेत की, या जोडप्याने आधीच लग्नाची योजना आखली असावी. हे लग्न मॅट्रिमोनिअल पोर्टलच्या प्रचारासाठी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.