आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड लोनबाबत लोकांचे विचार:‘गोल्ड लोन'बाबत भारतीय लोकांचे विचार बदलताहेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील गोल्ड लोनबाबत लोकांचे विचार बदलत आहेत. नवीन पिढी आता गोल्ड लोन घेण्यास मागेपुढे पाहत नाही. गोल्ड लोन कंपन्याही जागरूकता वाढवण्यावर भर देताहेत, असे मुथुट फायनान्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अभिनव अय्यर यांचे हे म्हणणे आहे. ज्येष्ठ पत्रकार राहुल यांच्याशी झालेल्या संवादातील काही अंश...

देशात गोल्ड लोनबद्दल लोकांची विचारसरणी किती बदलली आहे?
सोन्याच्या कर्जाबाबत अनेक वर्षांपासून कुटुंबातील लोकांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. भारतातील घरांमध्ये २४ हजार टन सोने उपलब्ध आहे; परंतु त्यातील ५ टक्केही सोने कर्जासाठी वापरले जात नाही. मात्र, आता बदल होताना दिसतो आहे. आम्ही जागरूकता वाढवण्यासाठी एक मोहीम चालवत आहोत. व्यवसायाच्या सुरुवातीपासून आम्ही ७२ कोटी ग्राहकांना सेवा दिली आहे. आता सामान्यांची धारणा बदलत असल्याचे दिसून येते.

मुथूट फायनान्सच्या विस्ताराच्या प्रवासाबद्दल थोडेसे सांगा.
मुथूट फायनान्सच्या जगभरात ५७५० पेक्षा जास्त शाखा आहेत. आमच्याकडे भारतात २० विभाग आहेत जे आम्हाला सोन्याच्या कर्जाच्या बाबतीत सर्वात मोठ्या एनबीएफसीपैकी एक बनवतात, दररोज २,५०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देतात. २०२३ साठी "खोलिए खुशियों की तिजोरी' या नावाने नवीन मार्केटिंग मोहीम सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

बातम्या आणखी आहेत...