आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी लोकसंख्या दररोज रेल्वेतून प्रवास करते. भारतीय रेल्वे नेटवर्कची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये केली जाते. कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत जाण्यासाठी भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा देखील म्हटले जाते.
मात्र, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी तिकीट काढणे आवश्यक आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये ट्रेनच्या तिकीटाशिवाय प्रवास करत असाल. अशा परिस्थितीत तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशावेळी तुमच्याकडे टीटीई किंवा टीसी तिकीट मागतात, त्याची तपासणी करतात. परंतू त्याचवेळी, लोक अनेकदा TTE आणि TC यांच्यात गोंधळून जातात. चला तर जाणून घेऊया की, टीटीई आणि टीसी यांच्यातील फरक काय असतो. त्यांचे नेमके काय काम असते रेल्वेमध्ये....!
TTE म्हणजे काय
टीटीई म्हणजेच प्रवासी तिकीट परीक्षक. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे तपासणे हे टीटीईचे काम आहे. त्यांची नियुक्ती प्रिमियम ट्रेन्सपासून ते देशात धावणाऱ्या एक्सप्रेसम मेलमध्ये केली जाते.
प्रवासादरम्यान एक रेल्वे कर्मचारी रेल्वेमध्ये चढतो आणि तिकीट तपासतो, तर अनेक वेळा प्लॅटफॉर्मवरही तो तिकीट तपासतो त्यांना टीटीई म्हणतात. तिकीट तपासणे, आयडी पाहणे, प्रवासी योग्य ठिकाणी बसले आहेत की नाही, प्रवाशांना योग्य जागा मिळाली की नाही, प्रवाशांना काही अडचण आहे की नाही हे पाहण्याचे काम टीटीईचं असतं.
टीटीईचा फूलफॉर्म ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असा आहे. कन्फर्म आरक्षण करूनही एखादा प्रवासी प्रवास करत नसेल. तर टीटीई अशा परिस्थितीत ती जागा आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील प्रवाशाला देऊ शकते.
टीसी म्हणजे काय असते?
टीसी आणि टीटीईचे काम जवळपास सारखेचं असते. फरक फक्त हा आहे की, टीसी रेल्वेच्या आत जाऊन तिकीट चेक करत नाही. त्यांची ड्युटी फक्त रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासण्याचे असते. वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान आणि प्लॅटफॉर्मची तिकीटे तपासण्याचे काम ते करतात. म्हणजेच टीसी स्टेशनवर राहूनचं फक्त तिकीट तपासण्याचे काम करतो. या दोघांची नियुक्ती रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून केली जाते आणि दोघेही याच विभागाचे कर्मचारी असतात.
कर्तव्यानुसार बदलते पदाची भूमीका
जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला रेल्वेमध्ये ड्युटी लावली जाते तेव्हा त्याला टीटीई म्हणतात, तर जेव्हा त्या कर्मचाऱ्याला फ्लॅटफॉर्मवर तिकीट तपासण्यास सांगितले जाते. तेव्हा त्याला टीसी म्हणतात. शिफ्टच्या आधारे कोण टीसी आणि कोण टीटीई हे ठरते. कर्मचारी तोच फक्त कर्तव्यानुसार त्याची भूमीका बदलते. आणि त्यानुसार पद बदलते.
तर ते तुमच्याकडून आकारू शकतात दंड
टीसी प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासतो. ड्युटी प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, टीसी देखील बाहेर पडण्याच्या आणि प्रवेशद्वारांवर तैनात आहेत. जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनचे तिकीट नसेल तर त्यांना हा अधिकार आहे. या परिस्थितीत, ते तुमच्याकडून दंड आकारू शकते.
युटीलिटी संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.