आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शेअर्सचे मूल्य यंदा आतापर्यंत सुमारे ११ टक्के घसरून २४७.७६ लाख कोटी रुपये राहिले. मूल्यांकनाच्या हिशेबाने जगातील टॉप-१० बाजारात ही सर्वात मोठी घसरण आहे. याच्या उलट जगभरातील इतर मोठ्या बाजारातील मार्केट-कॅप ९% पर्यंत वाढले आहे. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री हे यामागे सर्वात मोठे कारण होते. फेब्रुवारीत या बेँचमार्क निर्देशांकात ६% पेक्षा घसरण आली. २०२३ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स ५.४% आणि निफ्टी ६.३% घसरले. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात सुमारे २२,२०० कोटी रुपयाचे शेअर विकले. २०२२ मध्ये त्यांनी १.४० लाख कोटी रुपयाच्या शेअर्समध्ये विक्री केली होती.
ऑलटाइम हायपेक्षा ५०% खाली देशांतर्गत बाजारात ३०० पेक्षा जास्त शेअर्सचे मूल्य विक्रमी उच्चांकी पातळीपेक्षा ५० टक्के खाली आले. एस इक्विटीच्या आकड्यानुसार, या वर्षी आतापर्यंत ९२ शेअर्समध्ये ऑल-टाइम हायमुळे ७५% घसरण आली.
तीन कारणांमुळे घसरताहेत भारतीय शेअर इतर बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर काही महागडे होते ते विकून परकीय गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला.
चीनसारख्या दुसऱ्या बाजारांत परकीय गुंतवणूकदारांसाठी शेअर विकून पैसा परत घेऊन जाणे अवघड आहे. परकीय प्रमोटर भारतीय कंपन्यांचा वाटा विकत आहेत, मदरसन सुमीचे जपानी प्रमोटर्सनी ४० वर्षांनंतर शेअर विकले.
१५ जूननंतर बदलू शकतो कल एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन यांनी सांगितले, देशांतर्गत किंवा जागतिक पातळीवर सकारात्मक चिन्ह दिसून येत नाही. मात्र, १५ मार्चपासून देशात मान्सून सुरू होणार आहे. हवामानावर एल-निनोचा परिणाम झाला नाही तर शेअर बाजाराचा कल बदलू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.