आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:भारताची निर्यात 25 टक्क्यांनी वाढून 34.‍57 अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची निर्यात फेब्रुवारीमध्ये २५.१ टक्क्यांनी वाढून ३४.५७ अब्ज डॉलरवर पोहोचली, वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, व्यापार तूट २०.८८अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. या महिन्यात आयातही ३६ टक्क्यांनी वाढून ५५.४५ अब्ज डॉलरवर गेली. पेट्रोलियम आणि कच्च्या तेलाची आवक ६९ टक्क्यांनी वाढून १५.२८ अब्ज डॉलर झाली.

एप्रिल-फेब्रुवारी २०२१-२२ या कालावधीसाठी व्यापारी मालाची निर्यात ३७४.८१ अब्ज डॉलर होती, जी एप्रिल-फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये २५६.५५ अब्ज डॉलर होती. ज्यामध्ये ४६.०९ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली,” मंत्रालयाने म्हटले आहे. ११ महिन्यांच्या कालावधीत आयात ५९.३३ टक्क्यांनी वाढून ५५०.५६ अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल-फेब्रुवारी २०२०-२१ मधील ८८.९९ अब्ज डॉलरच्या तुलनेत या कालावधीत व्यापार तूट १७५.७५ अब्ज डॉलर नाेंद झाली. फेब्रुवारीमध्ये सोन्याची आयात ९.६५ टक्क्यांनी घसरून ४.८ अब्ज डॉलर ाली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात सुमारे २९.५३ टक्क्यांनी वाढून ६.२७ अब्ज डॉलर झाली आहे. फेब्रुवारीमध्ये अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम, रसायनांची निर्यात३२ टक्के, ८८.१४ टक्के आणि २५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. औंषध निर्यात मात्र फेब्रुवारीमध्ये १.७८ टक्क्यांनी घसरून १.९६ अब्ज डॉलर झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...