आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी हॉटेलचे खासगीकरण:खासगी हातात जाईल देशाचे पहिले सरकारी 5-स्टार हॉटेल अशोका

नवी दिल्‍ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची पहिली सरकारी ५-स्टार हॉटेल अशोकाला खासगी हातात सोपवण्याची तयारी सुरू आहे. सरकारने याला ऑपरेट-मेनटेन-डेव्हलप (ओएमडी) मॉडेलअंतर्गत ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त हॉटेलची अतिरिक्त ६.३ एकर जमीनदेखील व्यावसायिक कारणांसाठी विकली जाईल. येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) द्वारे लक्झरी अपार्टमेंट्स बांधले जातील.

त्याच्या विकासासाठी ४५० कोटी रुपये नव्याने खर्च केले जातील, असा अंदाज आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरूंनी युनेस्कोच्या संमेलनासाठी हे हॉटेल बनवले होते. हे हॉटेल १९५६ मध्ये सुरू झाले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय, मार्गरेट थॅचर, बिल क्लिंटन, चे ग्वेरा आणि फिडेल कॅस्ट्रोसारखे अनेक दिग्ग्ज या हॉटेलमध्ये थांबले आहेत. १९६० च्या दशकात हे हॉटेल बनवण्यासाठी ३ कोटी रुपये खर्च झाले होते. त्या काळात देशात सोन्याची किमत सुमारे ९० रुपये तोळा होती.

बातम्या आणखी आहेत...