आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील हिरे व्यवसायाला गती देण्यात चीन-भारतातील वाढता उच्च व मध्यम वर्गाचे मोठे योगदान राहील. जगभरात हिरे आणि हिऱ्याच्या दागिन्याची मागणी वर्षभरापूर्वी कोविडपूर्व पातळीवर पोहोचेल. अँटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरच्या(एडब्ल्यूडीसी) दहाव्या वार्षिक अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. हा अहवाल कन्सल्टंट फर्म बेनने तयार केला आहे. त्यानुसार हिऱ्याची मागणी वाढण्यात लॉकडाऊन धोरण, सरकारी पाठिंबा आणि ऑनलाइन सेल्सच्या बाजूने रिटेलर कलाचीही महत्त्वाची भूमिका असेल.
अहवालानुसार, २०२० च्या आधीपासून मंदीचा मार सोसणारा जागतिक हिरे उद्योग कोविड-१९ महामारीमुळे आणखी अडचणीत आला होता. २०२० मध्ये हिऱ्यांच्या उत्पादनात २० टक्क्यांची घसरण आली होती. रफ डायमंड विक्रीतही ३३ टक्क्यांची घसरण आली होती. खनिज कंपन्यांचा नफाही २२ टक्क्यांपर्यंत घटला होता. भारताचा विचार केल्यास लॉकडाऊन, मंदी आणि लग्नावर लावलेल्या निर्बंधामुळे हिऱ्याच्या रिटेल विक्रीत २६ टक्क्यांची घसरण आली आहे. अहवालानुसार, चीनमध्ये हिऱ्याच्या दागिन्याची मागणीत या वर्षी पूर्ण सुधारणा होईल. भारतात हे कोविड-पूर्व पातळीवर आणण्यात चीनच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागू शकतो. अमेरिकेतही २०२२-२३ पर्यंत मागणी जुन्या पातळीवर परतू शकते. तज्ज्ञांनुसार, २००९ मध्ये वित्तीय संकटामुळे भारतात जेम्स-ज्वेलरीची मागणी घटली होती.
पूर्ण क्षमतेने काम करतोय भारतातील हिरे उद्योग
जगभराचा ९५% रफ डायमंड पॉलिश करण्यासाठी सुरतला येतो. येथील हिरे उद्योग पूर्ण क्षमतेने काम करत आहे. कामगार परतत आहत. आयात-निर्यात जुन्या पातळीवर परतत आहे. -नानूभाई वेकरिया, अध्यक्ष, सूरत डायमंड असोसिएशन
मध्यमवर्गीयांचा हिऱ्याच्या दागिन्यांकडे वेगात वळतोय कल
अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा हिरे बाजार आहे. हिरे खनिज कंपनी डी-बियर्सच्या एका पाहणीनुसार, भारतात मध्यमवर्गात हिऱ्यांप्रतीचा कल वार्षिक १२% दराने वाढत आहे. भारत आणि चीनमध्ये ६०-७०% लोक मानतात की, लग्नसमारंभ आणि भेटवस्तूसाठी हिरा चांगला दागिना आहे. ७५-८०% नी महामारीनंतर हिऱ्याच्या दागिन्यात आधीपेक्षा जास्त खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.