आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:भारतातील पाम तेलाची आयात मे महिन्यात 7 महिन्यांतील सर्वाधिक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात भारतात ६.६० लाख टन पाम तेल आयात करण्यात आले होते. एप्रिलच्या ५.७२ लाख टनांपेक्षा हे प्रमाण १५% जास्त आहे. गेल्या ७ महिन्यांतील भारताने केलेली ही सर्वाधिक पाम तेल आयात आहे. विशेष बाब म्हणजे पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार इंडोनेशियाने २८ एप्रिल ते २३ मे या कालावधीत पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.तज्ज्ञांच्या मते, मलेशिया, थायलंड आणि पापुआ न्यू गिनीमधून भारताने इंडोनेशियाची कमतरता भरून काढली. भारत हा खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा पाम तेलाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने २० लाख टन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्यानंतर मे महिन्यात भारताच्या इतर खाद्यतेलाच्या आयातीतही वाढ झाली आहे. यामध्ये एप्रिलमधील ३.१५ लाख टनांच्या तुलनेत मे महिन्यात सोयाबीन तेलाची आयात वाढून ३.५२ लाख टन झाली.

बातम्या आणखी आहेत...