आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई 15 महिन्यांच्या निचांकी पातळीवर:मार्चमध्ये महागाई दर घटून 5.66% वर, खाद्यपदार्थांच्या किंमती घटल्याने महागाई घटली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर घटून 5.66% वर आला आहे. फेब्रुवारीत हा दर 6.44% होता. रिझर्व्ह बँकेच्या टॉलरन्स लेव्हलपेक्षा तो जास्त होता. जानेवारीत हा दर 6.52% होता. खाद्यपदार्थांच्या किंमती घटल्याने महागाई दर घटला आहे. कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या बास्केटमध्ये सुमारे अर्धा हिस्सा खाद्यपदार्थांचा असतो.

किरकोळ महागाईचा हा गत 15 महिन्यांतील निचांकी दर आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हा दर 4.91% होता. तर डिसेंबर 2021 मधअये 5.66% होता. खाद्यपदार्थांचा महागाई दरही घटून 4.79% वर आला आहे. फेब्रुवारीत हा दर 5.95% होता. वीज आणि इंधनांतील महागाईही कमी झाली आहे. वीज आणि इंधनांची महागाई 9.90% हून घटून 8.91% झाली आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात वाढला IIP

सरकारने फेब्रुवारी महिन्यातील इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शनचा डेटाही जारी केला आहे. फेब्रुवारीमध्ये आयआयपी 5.6% राहिला होता. तो गेल्या महिन्यात म्हणझेच जानेवारीच्या 5.5% पेक्षा जास्त आहे. औद्योगिक उत्पादनांतील तेजीचा हा सलग तिसरा महिना आहे. डिसेंबर 2022 मध्ये आयआयपी 4.7% होता. तर गेल्यावर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये आयआयपीची ग्रोथ 1.17% होती. देशातील कारखान्यांत कामकाज कसे चालते हे आयआयपीमधून कळते.

महागाईचा काय परिणाम होतो?

महागाईचा थेट संबंध खरेदी क्षमतेसोबत असतो. उदाहरण म्हणून, जर महागाई दर 7% असेल तर कमावलेल्या 100 रुपयांची किंमत 93 रुपये होते. म्हणूनच महागाई बघूनच गुंतवणूक करायला हवी. अन्यथा तुमच्या पैशांचे मूल्य कमी होते.

महागाई कशी वाढते-घटते?

महागाई वाढणे आणि घटणे मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असते. जर लोकांकडे पैसे असतील तर ते जास्त पैसे खर्च करतील. जास्त वस्तू खरेदी केल्याने मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर वस्तुंच्या किंमती वाढतील.

अशा रितीने बाजार महागाईच्या विळख्यात सापडतो, सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास पैशांच्या जास्त प्रवाहामुळे वस्तुंचा तुटवडा निर्माण होतो. दुसरीकडे मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्यास महागाई कमी होईल.