आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय आयटी उद्याेगाचा सुवर्णकाळ सुरू आहे. २०२१ मध्ये जगातील सर्वात माेठ्या कच्चा तेलाची निर्यात करणाऱ्या साैदी अरेबियाने जितकी कच्च्या तेलाची निर्यात केली त्यापेक्षा जास्त निर्यात भारताने केवळ साॅफ्टवेअरची केली आहे. २०२२ मध्ये आयटी निर्यातीत १० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षण अहवालानुसार, भारताने २०२१ आर्थिक वर्षामध्ये १३३.७ अब्ज डाॅलर (रु. ९.९४ लाख कोटी) किमतीच्या सॉफ्टवेअर सेवांची निर्यात केली. दुसरीकडे, या काळात सौदी अरेबियातून१२१.७४ अब्ज डॉलरचे कच्चे तेल निर्यात झाले. आजच्या घडीला, भारत हा केवळ जगातील दुसरा सर्वात मोठा सॉफ्टवेअर निर्यातदार देश नाही तर क्लाऊड सेवांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जागतिक सोर्सिंग बाजारामध्ये भारताचा वाटा ५५ टक्क्यांहून अधिक झाला आहे.
तथापि, २०२१-२२ मध्ये भारतीय आयटी आणि सॉफ्टवेअर बाजाराचे उत्पन्न १९५ अब्ज डाॅलरपर्यंत (सुमारे १४.५० लाख कोटी) पोहोचेल, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. या कालावधीत भारत सुमारे १५० अब्ज डाॅलर (रु. ११.१५ लाख कोटी) किमतीच्या सॉफ्टवेअर सेवांची निर्यात करेल. त्याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्था व रोजगाराला होईल.
जगभरात वाढलेल्या डिजिटायझेशनचे फायदे
मोतीलाल ओसवाल ग्रुपचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल म्हणाले की, कोविड महामारीमुळे जगभरात डिजिटायझेशन वाढले आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय आयटी कंपन्यांना होत आहे. २०२१ मध्ये, या उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे आणि लाखो व्यावसायिकांची भरती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.