आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India's Steel Man Former Tata Steel MD Jamshed Irani Passes Away At The Age Of 86

नाही राहिले भारताचे 'स्टील मॅन':टाटा स्टीलचे माजी MD जमशेद इराणींचे निधन, 86 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

जमशेदपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे 'स्टील मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. जमशेद जे इराणींचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. पद्मभूषण जमशेद जे इराणींनी सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी जमशेदपूरमधील टाटा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. टाटा स्टीलने एक वक्तव्य जारी करत आपले माजी व्यवस्थापकीय संचालक जमशेद इराणींच्या निधनाची माहिती दिली आहे.

2011 मध्ये टाटा स्टीलमधून निवृत्त

जमशेद जे इराणी 43 वर्षांच्या करिअरनंतर जून 2011 मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले होते. त्यांनी कंपनीला वेगवेगळ्या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय पातळींवर ख्याती मिळवून दिली होती. टाटा स्टीलने म्हटले आहे, 'एक दूरदृष्टी असलेल्या लीडरच्या रुपाने ते नेहमी आठवणीत राहतील'

टाटा स्टीलने पुढे म्हटले आहे, 'जमशेद इराणींनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेच्या लिबरलायझेशनदरम्यान टाटा स्टीलचे नेृतृत्व केले होते. त्यांनी भारतात स्टील इंडस्ट्रीच्या विकासात आपले अत्याधिक योगदान दिले.'

1963 मध्ये UK मधून मेटलर्जीत PhD

2 जून 1936 रोजी नागपुरात जीजी इराणी आणि खोरदेश इराणींच्या घरात जन्मलेल्या जमशेद इराणींनी 1956 मध्ये नागपुरातील सायन्स कॉलेजमधून BSc आणि 1958 मध्ये नागपूर विद्यापीठातून प्राणीशास्त्रात MSc केली होती. यानंतर ते जे एन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी 1960 मध्ये मेटलर्जीत मास्टर्स केले. नंतर 1963 मध्ये त्यांनी मेटलर्जीतच PhD मिळवली.

1968 मध्ये टाटा स्टीलमध्ये जॉईन

जमशेद इराणींनी 1963 मध्ये शेफिल्डमध्ये ब्रिटिश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनसह आपल्या व्यावसायिक करिअरला सुरुवात केली होती, मात्र ते नेहमी आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा विचार करत होते. 1968 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत काम करण्यासाठी ते भारतात परतले. तेव्हा त्यांनी कंपनीत डायरेक्टर इन्चार्ज ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेन्टच्या असिस्टन्ट पदावर जॉईन केले होते.

1985 मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले

असिस्टन्न पदावर काम केल्यानंतर जमशेद इराणी 1978 मध्ये जनरल सुपरिटेन्डेन्ट, 1979 मध्ये जनरल मॅनेजर आणि 1985 मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले. यानंतर पुन्हा ते 1988 मध्ये टाटा स्टीलचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्टर आणि निवृत्त होण्यापूर्वी 1992 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर बनले होते.

टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे संचालक राहिले

जमशेद इराणी 1981 मध्ये टाटा स्टीलच्या मंडळात सहभागी झाले आणि 2001 पासून एक दशकापर्यंत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरही राहिले. टाटा स्टील आणि टाटा सन्सशिवाय डॉ. इराणींनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससह टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी 1992 ते 1993 पर्यंत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सांभाळले होते.

2007 मध्ये पद्मभूषणने गौरव

जमशेद इराणींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यात 1996 मध्ये रॉयल अकादमी ऑफ इंजिनिअरिंगचे इंटरनॅशनल फेलो म्हणून त्यांची नियुक्ती आणि 1997 मध्ये महाराणी एलिझाबेथकडून भारत-ब्रिटिश व्यापार आणि सहकार्यात त्यांच्या योगदानासाठी मानद नाईटहूडचाही समावेश आहे.

इंडस्ट्रीमध्ये डॉ. इराणींच्या योगदानासाठी त्यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मेटलर्जीतील सेवांसाठी 2008 मध्ये भारत सरकारकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. इराणींच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी डेजी इराणी आणि त्यांची तीन मुले जुबीन, निलोफर आणि तनाज आहेत.

बातम्या आणखी आहेत...