आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India's WPI Inflation Rises | 12.54% In Oct | Food, Fuel Prices Food Inflation Rises To 12.5 Per Cent In October; The Main Reason For The Increase In Fuel Prices!

महागाईपासून दिलासा नाहीच:खाद्य पदार्थांच्या किंमतीत वाढ, ऑक्टोंबरमध्ये घाऊक महागाई दर 12.5 टक्क्यांवर; इंधन दरवाढ मुख्य कारण!

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. ऑक्टोंबर महिन्यात देशातील महागाई दर हा 12.5% इतका झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 10.6% इतका होता. तर एका वर्षापू्वी म्हणजेच ऑक्टोंबर 2020 दरम्यान हा दर 1.31% होता. महागाई वाढण्याचे प्रमुख कारण पेट्रोल-डिझेल, खाद्य पदार्थ आणि मेटल हे असल्याचे समोर आले आहे.

सात महिन्यात महागाईत वाढ
अवघ्या सात महिन्यात महागाई दर हा दहाच्या पार गेला आहे. ऑक्टोंबर महिन्यात महागाई दरात 2.28% बदल चढउतार पाहायला मिळाला. तर WPI ने जारी केलेल्या इंडेक्सनुसार महागाई दर सप्टेंबरमध्ये 1.14 टक्क्यांवरून सप्टेंबर महिन्यात 3.06% झाले आहे.

दर महिन्याला वाढत आहे महागाई ( ऑक्टोंबर vs सप्टेंबर)

खाद्य पदार्थ- 3.06% Vs 1.14% इंधन आणि पावर- 37.18% VS 24.81% बटाटे - -51.32% VS -48.95% जीवनावश्यक वस्तू - 5.20% VS 4.10% कांदे - -25.01% Vs -1.19% अंडी, मिठ आणि मासे- 1.98% VS 5.18% मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट - 12.04% VS 11.41% भाजी -18.49 Vs -32.45

4.48% होता रिटेल महागाई दर
याआधी शुक्रवारी रिटेल महागाई दर जारी करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोंबरमध्ये रिटेल महागाई दरात वाढ झाली असून, ती 4.35% वरून 4.48 टक्के इतकी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...