आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार:सीमेवरील तणावातही भारत- चीन व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या दिशेने

बीजिंग3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन यांच्यातील यंदाचा एकूण व्यापार १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या (७.५२ लाख कोटी रुपये) विक्रमी आकड्यालाही पार करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पूर्व लदाख सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करांत सुमारे दीड वर्षापासून तणाव असल्याने द्विपक्षीय संबंध दुरावले आहेत.

उभय देशांदरम्यान यंदाच्या ९ महिन्यांतील व्यापार एकूण ९०.३७ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत (६.८० लाख कोटी रुपये) पोहोचला आहे. चीनमध्ये सुरुवातीच्या ९ महिन्यांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, चीनची भारताला निर्यात ५१.७% वाढून ६८.४६ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर (५.१५ लाख कोटी रु.) गेली आहे. काेराेना महामारीच्या एप्रिल-मेमधील दुसऱ्या लाटेदरम्यान चीनमधून आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर्सची मागणी वाढल्याने ही वाढ झाली आहे. दुसरीकडे, भारताहून चीनला होणारी निर्यात ४२.५% वाढून २१.९१ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर (१.६४ लाख कोटी रु.) गेली आहे.

भारताची चीनशी व्यापारी तूट ३.५० लाख कोटी रुपयांवर
भारताची चीनशी व्यापारी तूट ४६.५५ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर (३.५० लाख कोटी रु.) गेली आहे. वर्षअखेरपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार, या वर्षाचे अजून ३ महिने शिल्लक आहेत. पूर्व लडाखमध्ये तणाव असतानाही दोन्ही देशांकडून पूर्वनिर्धारित १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे व्यापारिक उद्दिष्ठ गाठण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...