आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Has Come Down, But Why Is There A Question Mark On The Possibility Of Interest Rate Cut?

किरकोळ चलनवाढ:महागाई कमी झाली, पण व्याजदर कपातीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह का ?

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या ६% च्या वरच्या पातळीपेक्षा खाली घसरली. सामान्य लोकांच्या खर्चात पटकन घट झाली आणि हा दिलासा आगामी काही महिन्यापर्यंत सुरू राहील, असा त्याचा अर्थ होत नाही. रिझर्व्ह बँक रेपो दराप्रमाणे धोरणात्मक दर वाढवणे थांबवेल, याची शक्यता कमी आहे.

५.८८% िकरकोळ महागाई दराचा अर्थ काय ? याचा थेट अर्थ म्हणजे, गेल्या महिन्यात किरकोळमध्ये किमती त्या पातळीवरून ५.८८ टक्के वाढल्या, ज्या पातळीवर नोव्हेंबर २०२१ मध्ये होत्या. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा खाली आले. ऑक्टोबरमध्ये महागाई दर ६.७७% होता.

कोणत्या वस्तूंची महागाई घटली ? प्रामुख्याने खाद्यपदार्थांची महागाई कमी झाली. उदाहरणार्थ, सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थ ८.६% ने महागले. हा दर ऑक्टोबरमध्ये ७% आणि नोव्हेंबरमध्ये फक्त ४.६७% वर आला.

महागाईचा काळ संपला का ? देशात महागाई अजूनही सामान्यपेक्षा जास्त आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई पुन्हा एकदा ६.५% पेक्षा वर जाऊ शकते. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ६% राहू शकते. मार्च २०२३ मध्ये ते निश्चितपणे ५%पर्यंत खाली येऊ शकते.

का वाढू शकते महागाई ? त्यामुळेच महागाई नोव्हेंबरमध्ये ६ टक्के राहिली, जी ऑक्टोबरमध्ये याच पातळीवर होती. याचा अर्थ गेल्या महिन्यात फक्त खाण्याच्या वस्तू आणि एनर्जीच्या महागाईत थोडी कमी आली. इतर सर्वच वस्तूंच्या महागाईत कुठेच कमी आली नाही. कपड्यांपासून ते इतर वस्तूंपर्यंत घरातील सर्व सेवा महागली आहे. याव्यतिरिक्त पुढच्या महिन्यात कमी बेसचा फायदाही मिळणार नाही. कारण नोव्हेंबर २०२१ मध्ये किरकोळ चलनवाढ केवळ ४.९१% होती, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती ५.६६% होती. याचा अर्थ भाव किंचित वाढला तरी महागाईचा दर ६% च्या वर जाईल.

रिझर्व्ह बँक दर वाढवणे थांबवेल का? याची शक्यता कमी आहे. याचे दोन मोठी कारणे आहेत. एक म्हणजे आगामी महिन्यात महागाई दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त मंगळवारपासून अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची बैठक सुरू झाली. अमेरिका आणि युरोपमधील व्याजदर वाढत राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँकेला दर वाढवणे भाग पडेल.

बातम्या आणखी आहेत...