आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्र:महागाई वाढली; रोजचा खर्च कमी करण्यासाठी 50:30:20 नियम पाळा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती महागाई, तुमची कमाई आणि बचतीची मूल्य सतत कमी होत चालली आहे. अशात खर्च कमी करुन बचत करणे गरजेचे आहे. बचतीशिवाय तुम्ही भविष्यात गंुतवणूक करू शकणार नाहीत. सद्य:स्थितीत तुम्ही ५०:३०:२० चा नियम पाळू शकता. हा नियम खूप सोपा आहे. टॅक्स दिल्यानंतर वाचलेल्या एकूण कमाईचा ५० टक्के भाग आवश्यक वस्तूंवर खर्च करावा.

३० टक्के भागाचा वापर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करावा आणि कमीत कमी २० टक्के भाग वाचवावा. विशेष म्हणजे हा नियम त्या स्थितीसाठी आदर्श आहे, जेव्हा महागाई सामान्य पातळीवर (२-५%) वर असेल. सध्या देशातील किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर आहे. याशिवाय रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने कर्जाचा ईएमआयही वाढला आहे. अशा परिस्थितीत इतर खर्च कमी करून २० टक्क्यांहून अधिक बचत करावी लागेल. हे करणे अवघड आहे, पण अशक्य नाही. जाणून घेऊया याचे काही उपाय...

वैयक्तिक महागाई दर मोजा एकाच प्रकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दोन वेगवेगळ्या दिवशी झालेल्या खर्चाची तुलना करा. सध्याच्या युगात यासाठी अनेक प्रगत मोबाइल अॅप्स किंवा व्यवस्थापन साधने आहेत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खर्चाची अगदी सहज गणना करू शकता. असे केल्याने, आज झालेल्या खर्चाची आदल्या दिवशीच्या खर्चाशी तुलना करून महागाईचा परिणाम समजू शकता. यानंतर जो खर्च वाढला, तो कसा भरून काढता येईल ते पाहा.

परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करा तुम्ही जेव्हा बचत करून महागाईचा प्रभाव कमी करता तेव्हाच खरा परतावा मिळतो. तुम्हाला बँक एफडी आणि यासारख्या इतर योजनांमधून महागाईवर मात करण्यासाठी पुरेसा परतावा मिळणार नाही. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

जितके शक्य होईल तितके अनावश्यक गोष्टीचा खर्च टाळा अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. यामध्ये थिएटरमध्ये चित्रपट पाहणे, रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण, लांब ड्राइव्हला जाणे यांचा समावेश होतो. तुम्ही या गोष्टींवर किती खर्च करता हे समजून घेण्यासाठी तुम्ही बँक किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासू शकता.

शेअरमध्ये गंुतवणुकीआधी व्यवसायावर नजर ठेवा महागाई जास्त असेल तर रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवायला सुरुवात करते. फटका व्यवसायांना बसतो. कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, महागाई आणि वाढत्या दरांचा कंपनीच्या व्यवसायावर काय परिणाम होतो ते पहा. महागाईमुळे काही कंपन्यांची उत्पादने महाग होतात.

बातम्या आणखी आहेत...