आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राबोबँकचा अहवाल:महागाईचा आणखी त्रास होणार, महागाई दर 12% पर्यंत वाढण्याचा अंदाज

श्वेता सुनील | नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचा खर्च पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक नाेटा छापेल

कोरोना संकटामुळे भारतातील महागाईत वेगाने वाढ होऊ शकते. पुढील वित्त वर्ष २०२१ पर्यंत महागाई १२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. डच मल्टिनॅशनल बँकिंग कंपनी राबोबँकेने हा अंदाज व्यक्त केला आहे. राबोबँकेनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपया २०२० च्या पातळीपेक्षा १६% पर्यंत कमकुवत होऊ शकतो. बँकेने आपल्या अहवालात नमूद केले की, भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा महागाई दुप्पट होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने सरकारचा खर्च पूर्ण करण्यासाठी जास्त चलन छापण्यास सुरुवात केल्यास चलन मूल्य एक चतुर्थांश कमी होऊ शकते.

राबोबँकेनुसार, भारताला १९८० च्या दशकातील चुकांच्या पुनरावृत्तीपासून वाचले पाहिजे. तेव्हा रिझर्व्ह बँकेने सरकारी कर्जाचे मॉनिटायझेशन केले होते. म्हणजे, सरकारी कर्जाच्या रकमेसमान नोटा छापल्या हाेत्या. यामुळे चलन पुरवठा जास्त झाला आणि पुन्हा महागाई दरात वेगाने वाढ झाली. बँकेचे विश्लेषक मायकेल हर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या अहवालानुसार, जास्तीच्या चलनामुळे महागाई वाढते, जी देशाच्या आर्थिक कामगिरीसाठी चांगले संकेत देत नाही. आधुनिक चलन सिद्धांतात सरकारे संकटाबाहेर निघण्यासाठी आपला पैसा खर्च करतात आणि तो भरून काढण्यासाठी जास्त चलन छापतात. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल हानिकारक असेल. मात्र, भारताचे वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प अधिनियम आरबीआयला प्राथमिक बाजारात सरकारला थेट रोखे खरेदी करण्यात अटकाव करते. मात्र, देशाची राष्ट्रीय आपत्ती किंवा तीव्र मंदीचा सामना करण्याच्या स्थितीत कायद्यात त्याला परवानगीही आहे.

बातम्या आणखी आहेत...