आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेचा झटका:महागाई नियंत्रणाबाहेर, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.5% वाढवला, काँग्रेसही रस्त्यावर

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईशी झुंज देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा झटका दिला आहे. शुक्रवारी बँकेने पतधोरण आढाव्यात रेपो रेट ०.५% वाढवून ५.४% केले. या वर्षी रेपो दरातील ही सलग तिसरी वाढ आहे. मे २०२२ नंतर रेपो रेट १.४०% वाढला आहे. कोरोना काळादरम्यान रेपो रेट घटून ४.०% च्या पातळीवर आला होता. नव्या वाढीमुळे आता हा ऑगस्ट २०१९ च्या पातळीवर पोहोचला आहे. या वाढीमुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. बँकांकडून कर्ज घेणे महाग होईल.

लाेकांचे आर्थिक गणित विस्कळीत होऊ शकते : नवीन कर्ज घेणाऱ्यांनी सतर्क राहावे. कर्जाच्या दरवाढीसोबत अवधीत वाढ होऊ शकते. निवृत्तीसाठी गुंतवणूक किंवा मुलांच्या शिक्षणासाठीचे आर्थिक नियोजन बिघडू शकते,असे बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले.

किरकोळ महागाई दर अस्वीकार्य रूपात ७% च्या आसपास आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये ०.५०% ची आक्रमक वाढ करावी लागली.' शक्तिकांत दास

आनंदाची बातमी : दोन कारणांनी चांगले दिवस येण्याची आशा
२. अर्थव्यवस्था बळकट, तेजीचे संकेत : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले, देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट आहे. मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा ६% अधिक झाला आहे. खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. शहरी मागणी मजबूत होत आहे. ग्रामीण मागणीही वेग घेत आहे.
२. २०२३-२४ मध्ये महागाई दर ५% वर येईल : रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ६.७% वर कायम ठेवला आहे. सप्टेंबर तिमाहीत किरकोळ महागाई दर ७.१% राहील. तथापि, २०२३-२४ च्या जून तिमाहीमध्ये तो ५% वर जाईल.

आक्रमक वाढ करावी लागली...
किरकोळ महागाई दर अस्वीकार्य रूपात ७% च्या आसपास आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये ०.५०% ची आक्रमक वाढ करावी लागली.' शक्तिकांत दास

बातम्या आणखी आहेत...