आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Over; Inflation Was 4.59 Per Cent In December And 6.93 Per Cent In November

खिशाला दिलासा:महागाईचा दंश संपला; डिसेंबरमध्ये 4.59 टक्के, नोव्हेंबरमध्ये 6.93% महागाई दर होता

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून महागाईची झळ सोसणाऱ्या देशवासीयांना यापासून मुक्तता मिळेल, असे दिसत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर घटून ४.५९ टक्के राहिला. हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या आत आहे. महागाईचा आकडा नोव्हेंबर २०१९ पासून आतापर्यंत सर्वात कमी आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.९३ टक्के होता. मंगळवारी जारी केलेल्या आकड्यानुसार, गेल्या महिन्यात महागाई दर घटण्यामागे सर्वात मोठे कारण, भाज्या आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमतीत बरीच घसरण येणे हे होय. नोव्हेंबरमध्ये भाज्यांचा महागाई दर सुमारे १५ टक्के होता. हा डिसेंबरमध्ये घटून उणे १० झाला. मात्र, खाद्यतेल आणि डाळींची महागाई अनुक्रमे २०% आणि १५% आहे. सर्वसाधारण लोकांसोबत अर्थव्यवस्थेसाठी ही महागाई दर घटणे दिलासा देणारी बाब आहे. रिझर्व्ह बँक रिटेलमधील महागाई दराच्या आकड्याच्या हिशेबाने दर दोन महिन्यांत धोरणात्मक व्याज दरांचा निर्णय घेते. गेल्या काही महिन्यांपासून महागाई दर एका मर्यादेपेक्षा जास्त राहिल्यामुळे केंद्रीय बँकेने आर्थिक धोरणाबाबत आपली भूमिका बदलली होती आणि रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता.

दरवाढ शक्यता नाही, घसरण सुरू राहिल्यास कमी शक्यता
जगभरात महागाई वाढत होती तेव्हा भारतातही महागाई वाढण्याचा काळ होता. याचे कारण, खाद्य महागाई होते. लॉकडाऊनवेळी पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि मागणी-पुरवठ्यात संतुलन बिघडले होते. आता स्थिती सुधारत आहे. नोव्हेंबरमध्ये भाज्यांचा महागाई दर १५% वर होता. आता उणे १० झाला आहे. या वर्षी महागाई दर खाली राहील, अशी आम्हाला आशा आहे. घटत्या महागाई दरामुळे आरबीआयला सर्वात जास्त दिलासा जाणवला असेल, कारण महागाईच्या उच्च दरामुळे त्यावरील दरांत वाढीचा दबाव राहत होता. आरबीआय या दबावापासून मुक्त होईल. येत्या ३-४ महिन्यापर्यंत दर चार आठवड्याच्या पातळीपर्यंत राहिल्यास व्याज दरात एक कपातही पाहू शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेत तरलता वाढेल. महागाई दरातील घट चांगला संकेत आहे. - सुजन हाजरा, मुख्य अर्थतज्ञ, आनंद राठी सिक्युरिटीज

औद्योगिक उत्पादन पुन्हा घटले, आयआयपी -1.9%
देशाच्या औद्योगिक उत्पादनात दोन महिन्यांनंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक(आयआयपी) -१.९ वर राहिला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, आयआयपीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची ७७.६३ टक्के हिस्सेदारी आहे. याच्या उत्पादनात वार्षिक १.७% घसरण नोंदली आहे. दुसरीकडे, खाण क्षेत्राच्या उत्पादनात १.७ टक्क्यांची घट आली आहे.
महागाई दर (टक्क्यांत)

- नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर भाज्या १५.६३% महाग , डिसेंबरमध्ये १०% पेक्षा जास्त घटले भाव. - रिव्हर्स गिअरमध्ये भाज्यांचा महागाई दर, डाळी व खाद्यतेल अद्यापही महाग - धोरणाबाबत आपली भूमिका बदलली होती आणि रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...