आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Reached A Record Level Of 7 Months, Retail Inflation Reached 6.01% In January

सामान्य माणसाला धक्का:7 महिन्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचली महागाई, रिटेल महागाई दर जानेवारीमध्ये 6.01% वर पोहोचला

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीत किरकोळ किमतींच्या हिशोबाने महागाई दर वाढून 6.01% झाला आहे. जो डिसेंबर 2021 मध्ये 5.66% होता. गेल्या 7 महिन्यांतील हा केवळ उच्चांकच नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कम्फर्ट लेव्हलपेक्षाही वरचा आहे. सरकारने चलनवाढीचा दर 4-6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय बँकेला दिली आहे.

सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात कारखान्यांमधील खाद्यपदार्थ आणि तयार वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आरबीआयने गुरुवारी अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्षासाठी (31 मार्च 2022 पर्यंत) महागाई दर 5.3% असेल. मात्र हा अंदाज चुकीचा ठरेल असे दिसते. देशात कोविड महामारी सुरू झाल्यापासून चहा, खाद्यतेल आणि डाळी यांसारख्या दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू 20% ते 40% ने महागल्या आहेत.

घाबरू नका, पहिलेच शंका होती : RBI गव्हर्नर
महागाईचे आकडे समोर येण्यापूर्वीच, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले होते की, आज जाहीर होणाऱ्या आकडेवारीत किरकोळ महागाई 6% च्या आसपास असू शकते. याला घाबरण्याची गरज नाही. याची आम्हाला आधीच भीती वाटत होती. ऑक्टोबरपासून महागाई वाढण्याचा वेग मंदावला आहे.

जानेवारीत घाऊक महागाईत किरकोळ दिलासा, 13% च्या खाली
जानेवारीत घाऊक महागाईत थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात घाऊक महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात 12.96% पर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घाऊक किमतींचा महागाई दर 13.56% होता, जानेवारी 2021 मध्ये तो केवळ 2.51% होता. एप्रिल 2021 पासून घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात आहे.

सलग वाढली रिटेल महागाई

महिनामहागाई दर
सप्टेंबर 20214.35%
ऑक्टोबर 20214.48%
नोव्हेंबर 20214.91%
दिसेंबर 20215.59%
जानेवारी 20226.01%
बातम्या आणखी आहेत...