आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Reduction On Paper, Not In The Kitchen; Hard To Console For Three Months

अडचण:महागाई घट कागदावर, स्वयंपाकघरात नाही; तीन महिन्यांपर्यंत दिलासा कठीण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासादायक आकडेवारीनंतरही खिसा रिकामा होतोय

गेल्या एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईच्या आकड्यांत घट आली, मात्र आपल्या स्वयंपाकघरात ठाण मांडलेली महागाई घरातून बाहेर जाण्याचे नाव घेत नाही. जानेवारीपासून आतापर्यंतचे आकडे पाहिल्यास भाज्या आणि तांदळाशिवाय सर्व खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. यामध्येही खाद्यतेल आणि डाळी प्रामुख्याने महाग झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यांच्या किमतीत कोणताही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

जानेवारीमध्ये मोहरी तेलाचा ठोक भाव १२० ते १२५ रु. प्रतिकिलो होता. हा आता वाढून १५० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊकमध्ये याचा २०० रु. प्रतिकिलोपर्यंत भाव वसूल केला जात आहे. सोयाबीन रिफाइंडचे घाऊक भावही जानेवारीच्या १२० रु. प्रतिलिटरवरून वाढून १४५ रु. प्रतिलिटर झाले आहेत. किरकोळमध्ये किंमत आणखीही जास्त आहे. सूर्यफूल आणि शेंगदाण्याचे भाव जास्त आहेत. याच पद्धतीने मुगाशिवाय सर्व प्रकारच्या डाळींच्या किमतीत चार महिन्यांत चांगली वाढ नोंदली आहे. रब्बीत गव्हाची आवक होते, असे असताना जानेवारीच्या तुलनेत मेमध्ये आट्याच्या भावात वाढ झाली.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. कमोडिटी अॅडव्हायझरी फर्म केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले, जेव्हा महामारी येते तेव्हा कृषी उत्पादनांची भाववाढ होते. या वेळीही असेच झाले. मोहरी, सोयाबीन आदीच्या आवक हंगामातही किमती घटण्याऐवजी वाढत आहेत. अशा स्थितीत खाद्यतेलांच्या किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. डाळींतही अशी स्थिती आहे. आयात शुल्कापेक्षाही जास्त दिलासा मिळणार नाही. कारण, बहुतांश देशांतून शिपिंगसह खर्च जास्त होतो. सध्या टांझानियातून डाळ येत आहे. मात्र, तीही पुरेशी नाही.

खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने मागवले सल्ले
केंद्राने खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी तेल गिरणी मालक, घाऊक डीलर व या उद्योगाच्या विविध संघटनांकडून सल्ले मागितले आहेत. साेमवारी केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने कृषी, ग्राहक मंत्रालय व गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व तामिळनाडूच्या अधिकारी व खाद्यतेल उद्योगाशी संबंधित हितधारकांसोबत योग्य किमतीच्या मुद्द्यावर बैठक ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...