आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation, Weak Global Demand, Yet The Fastest Growth In 11 Years In The Services Sector

नवी दिल्ली:महागाई, कमकुवत जागतिक मागणी, तरीही सेवा क्षेत्रात 11 वर्षांतील सर्वात वेगवान वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडचे निर्बंध हटताच देशातील सेवा क्षेत्राला गती मिळाली आहे. वाढती महागाई आणि जागतिक मागणी कमी होत असतानाही मे महिन्यात उद्योगाने ११ वर्षांतील सर्वात जलद गतीने वाढ नोंद केली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

एस अँड पी ग्लोबल इंडियाचा ‘सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) मे महिन्यात ५८.९ वर पोहोचला, जो एप्रिलमध्ये ५७.९ होता. एप्रिल २०११ नंतरची ही सर्वात वेगवान वाढ आहे. या निर्देशांकाचे ५० वर राहणे विस्तार दर्शवते. मे महिना हा सलग १० महिना होता जेव्हा सेवा क्षेत्राचा व्यवसाय वाढला आहे.

एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या सहयोगी संचालक (अर्थशास्त्र) पोलियाना डी लिमा म्हणाल्या “भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण खुली झाल्याने सेवा क्षेत्राला आधार मिळाला. जुलै २०११ पासून मोठ्या संख्येने नवीन ऑर्डर्स मिळाल्यामुळे व्यावसायिक घडामोडी वेगाने वाढल्या आहेत. मार्च २०२० पासून भारतीय सेवांच्या जागतिक मागणीत सातत्याने घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...