आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inflation Will Fall This Year, Interest Rates Will Rise, Double Digit Growth In Wages | Marathi News

2022 मध्ये विशेष काय?:या वर्षी महागाई घटणार, व्याजदर वाढणार, वेतनात डबल डिजिट ग्रोथ... क्रिप्टोकरन्सीत तेजी कायम

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महागाई घटणार, अशी 44 तज्ज्ञांना 100% खात्री आहे

वर्ष २०२२ मध्ये काय महत्त्वाचे बदल होतील यावर गेल्या दोन आठवड्यांत जगभरात शेकडो विश्लेषणे प्रकाशित झाली आहेत. अर्थशास्त्राचे संशोधक निक रॉतले, कारमॅन आंग आणि डोरोते नेउफेल्ड यांनी आयएमएफ, गोल्डमन सॅक्स, डेलॉइट, ब्लूमबर्ग, इकॉनॉमिस्ट, फिच सोल्युशन्स, मॉर्गन स्टॅनली, फोर्ब्ज, एमआयटी, पीडब्ल्यूसी, वूड मॅकन्झीसह ३०० संस्थांचे अहवाल आणि तज्ज्ञांच्या ताज्या मुलाखतींचा अभ्यास केला आहे. सर्वाधिक संस्था व तज्ज्ञांना जगात जे १० ट्रेंड्स तयार होण्याबाबत किंवा कायम राहण्याबाबत १००% खात्री आहे, ते असे...

शेअर बाजारातील परतावा घटणार
सन २०२१मध्ये कमाईच्या दृष्टीने शेअर बाजाराने सर्वोत्तम परतावा दिला. जगभरातील बाजारात २० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला. परंतु सन २०२२-२३ मध्ये शेअर बाजारातून सिंगल डिजिट परतावा मिळण्याची शक्यता आहे. दोलायमान स्थितीमुळे बाजारात अस्थिरता असेल.

युद्धजन्य परिस्थिती जगासमोर चिंता
अमेरिका-इराण यांच्यातील वाद आणखी वाढेल. इराण-इस्रायल यांच्यातील तंटाही कायम राहील. युक्रेनमधील रशियाच्या हस्तक्षेपामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते. तैवानवरील चीनच्या वाढत्या दबावामुळे युद्धाला तोंड फुटण्याची भीती आहे.

‘वेब 3’ च्या वापरात आणखी वाढ होणार
‘वेब 3’ इंटरनेटच्या विकेंद्रीकरणाचे स्वरूप आहे. सध्या आपण ‘वेब 2.0’ चा वापर करतोय. त्याचे नियंत्रण संबंधित टेक कंपनीकडे असते. तर ‘वेब 3’ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात डेटा एकाच सर्व्हरवर नसतो. क्रिप्टो नेटवर्कही त्यावरच चालते.

हे वर्ष कामगारांच्या वर्चस्वाचे राहणार
अमेरिका आणि युरोपात नोकरी सोडण्याचा ट्रेंड कायम आहे. त्यामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांना आकर्षक पॅकेज द्यावे लागत आहे. ब्रिटन-फ्रान्स-जर्मनी-इटलीमध्ये त्याची सुरुवात झाली आहे.कुशल कामगारांच्या वेतनात यंदा डबल डिजिट वाढ होऊ शकते.

क्रिप्टोकरन्सी वाढीचा वेग कायम
गुंतवणुकीसाठी सर्वाधिक जोखमीच्या क्रिप्टोकरन्सीत पुढेही तेजी कायम राहू शकते. बहुतांश देश त्याला सरकारी मान्यता देणारच नाहीत, पण त्यात होणारी गुंतवणूक सतत वाढू शकते. कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणारे जगातील ९९% लोक आतापर्यंत त्यापासून दूर आहेत.

व्याजदर वाढणार, एप्रिलपासून सुरुवात
अमेरिका, ब्रिटनसह सर्व प्रमुख देशांत कर्ज किंवा बँकेतील जमा रकमेवर व्याजदर वाढेल. २०२२-२३ च्या सुरुवातीलाच अमेरिकी फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड आणि पीपल्स बँक ऑफ चायना दर वाढवण्यास सुरुवात करतील. त्याचा परिणाम जगभर दिसेल.

महागाई घटणार, पण हळूहळू
कोरोनाकाळात १५० पेक्षा जास्त देशांत महागाई दर सरासरीपेक्षा जास्त राहिला आहे. एप्रिलनंतर त्यात दिलाशाची अपेक्षा आहे, पण महागाई वाढीचा दर कमी होण्यास ९ ते १२ महिने लागतील. खाद्य महागाई वाढीचा दर वेगाने घटेल, तर इतर वस्तूंच्या महागाई दरात हळूहळू घट होईल.

श्रीमंत देश कोरोना नष्ट करू शकतात
युरोपातील श्रीमंत देश महामारी नष्ट करण्याच्या शेवटच्या टप्प्यात असतील. तेथे लसीच्या बूस्टर डोस आणि नवीन औषधामुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू जवळपास शून्य करण्यास मदत मिळेल. मध्यम वय व कमी उत्पन्नाच्या देशांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका राहील.

रॅनसमवेअर हल्ला वेगवान होऊ शकतो
जगभरातील कामात डिजिटलायझेशन ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता मोठ्या टेक कंपन्यांची वृद्धी कायम राहू शकते. मात्र, ज्या वेगाने रॅनसमवेअर हल्ला वाढत आहे, त्यातून सायबर सुरक्षेच्या आघाडीवर जगभरात आव्हाने वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ई-व्हेईकलचे बॅनर वर्ष, स्वस्त पर्याय
२०२२-२३ मध्ये ई-व्हेईकलचे शेकडो पर्याय बाजारात येतील. पहिला- कंपन्यांवर ई-वाहनांच्या किमती कमी करण्याचा दबाव वाढेल. दुसरा- युरोपच्या दोन डझन देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने बंद करण्याचा आराखडा तयार होईल. या संदर्भातील डेडलाइन समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...