आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील सायबर हल्ल्यामुळे कंपन्यांचे बरेच नुकसान होते. भारतातही कंपन्या सलग सायबर सुरक्षेसाठी साधनांचा वापर करत आहे. जागतिक व्यावसायिक सेवा देणारी प्राइस वाटर हाउस कूपर (पीडब्ल्यूसी)च्या ताज्या सवेक्षणात सहभागी भारताचे ८२% बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणतात की, २०२३ मध्ये ते सायबर सुरक्षा बजेट वाढवणार आहेत. ८९% अधिकाऱ्यांच्या मते, त्यांच्या कंपनीच्या सायबर सुरक्षा टीमने बऱ्याचदा सायबर धोका ओळखून व्यवसायचे नुकसान होण्यापासून वाचवले. जगभरात हा आकडा ७०% आहे. सर्वेक्षण केलेल्या ८३ टक्के भारतीय व्यावसायिकांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीच्या सायबर सुरक्षा टीमने पुरवठा साखळी जोखीम व्यवस्थापनात सुधारणा केली आहे. पीडब्ल्यूचे ग्लोबल डिजिटल ट्रस्ट इनसाइट्स सर्वेक्षण ६५ देशांतील ३,५२२ प्रतिसादकर्त्यांनी केले. त्यात भारतीय कंपन्यांच्या १०३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या सर्वेक्षणानुसार २०२३ मध्ये जगभरातील कंपन्या सायबर गुन्ह्यांबाबत अधिक चिंतित आहेत. ६५ टक्के अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२२ पेक्षा २०२३ हे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.