आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Initiatives Of 22 Companies For Mobile Manufacturing Worth Rs 11 Lakh Crore, Proposals From Home And Abroad Under PLI Scheme

स्वावलंबी भारत:22 कंपन्यांचा 11.5 लाख कोटींच्या माेबाइल निर्मितीसाठी पुढाकार, पीएलआय योजनेअंतर्गत देश-विदेशातून आले प्रस्ताव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊननंतर 1.8 कोटी फोनची झाली विक्री, देशात स्मार्टफोन युजर आता 50 कोटींच्या वर

कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानामध्ये रोजगाराबाबत एक दिलासादायक बातमी आहे. देशांतर्गत २२ आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पुढील ५ वर्षांत देशात सुमारे ११.५ लाख कोटींच्या मोबाइल फोनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यानुसार, यामुळे १२ लाख लोकांना रोजगार मिळेल. ३ लाख रोजगार प्रत्यक्ष तर ९ लाख अप्रत्यक्ष रोजगार असेल. केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेअंतर्गत हे प्रस्ताव आले आहेत. यात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन या आयफोन तयार करणाऱ्या कंपन्यांशिवाय सॅमसंग, लाव्हा व मायक्रोमॅक्सचा समावेश आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर या कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करतील, असे मंत्री प्रसाद यांनी सांगितले.

उत्पादनाचा २०% भाग अॅपल भारतात हलवणार

पीएलआयचा लाभ घेण्यासाठी अॅपल भारतात उत्पादन वाढवेल. कंपनी स्मार्टफोनचे २०% उत्पादन भारतात हलवत आहे. मार्केट एक्स्पर्ट शिल्पी जैन यांच्यानुसार, लावा व मायक्रोमॅक्ससारखे भारतीय ब्रँड याचा फायदा घेऊन बाजारपेठेतील भागीदारी वाढवू शकतात.

लॉकडाऊननंतर १.८ कोटी फोनची झाली विक्री, देशात स्मार्टफोन युजर आता ५० कोटींच्या वर

प्रमोद कुमार. नवी दिल्ली | कोरोना संकटातही देशात स्मार्टफोन युजर्स ५० कोटींवर गेले आहेत. ३१ मार्चपर्यंत ४८.३ कोटी युजर्स होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर मे-जूनमध्ये १.८ कोटी फोन विक्री झाल्याने ही संख्या वाढली. याशिवाय ३५ कोटी लोक फीचर फोन वापरत आहेत. मात्र, लॉकडाऊन काळात या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

> 51% घट स्मार्टफोनच्या विक्रीत नोंदवली गेली. ही घट लॉकडाऊननंतर एप्रिल, मे आणि जूनमध्ये नोंदवण्यात आली.

> 68% फीचर फोनची विक्री झाली कमी. फोनऐवजी अत्यावश्यक बाबींकडे लोकांचा कल.

> 45% ए‌‌वढी विक्रमी ऑनलाइन विक्री झाली. अनेक उत्पादने ऑनलाइन लाँच केली.

चीन विराेधामुळेे सॅमसंगची विक्री ९४% वाढली

> चीनविराेधी भावनेचा फायदा दक्षिण कोरियाच्या सॅमसंगला झाला. एका महिन्यात कंपनीची ९४% विक्री ‌वाढली.

> सॅमसंगच्या एका अधिकाऱ्यानुसार, एका महिन्यात फोनच्या विक्रीत ए‌वढी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

> भारतीय बाजारपेठेत २९% भागीदारीसह चिनी कंपनी शाओमी अजूनही अग्रस्थानी.

बातम्या आणखी आहेत...