आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन विचारांचा ​​​​​​​फॉर्म्युला:प्रॉब्लेम सॉल्व्हरसारखा विचार करतात इनोव्हेटर्स, मिळतात आयडिया

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या २० व्या वर्षी आेयो रुम्स सुरू करणारा रितेश अग्रवाल आज देशातील यशस्वी उद्योजकांमध्येच समाविष्ट नाही तर एक नावीन्यपूर्ण उद्योजक म्हणूनही त्याची ओळख आहे. रितेशने एक स्टार्टअप म्हणून एक कल्पना तयार केली, ज्या अंतर्गत लोक त्यांच्या बजेटमध्ये त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये रूम बुक करू शकतात. आज आेयो रूम्स ९ अब्ज डाॅलरपेक्षा जास्त किमतीची हॉटेल चेन बनली आहे. रितेश सांगतो, समस्या सोडवणाऱ्यांप्रमाणे काम करतो, नावीन्य कंपनीच्या डीएनएमध्ये आहे. किंबहुना, यशाच्या साखळीत नावीन्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. रितेशच्या विधानाशी जगभरातील यशस्वी उद्योजक सहमत आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, इनमाेबिचे नवीन तिवारी, अॅमेझाॅनचे जेफ बेझाेस, इबेचे पि्ररे आेमिदयार आणि पीअँडजीचे ए.जी.लाफाले हे उबिझनेस लिडर्सच्या यादीत आहेत. इनाेव्हेशन्सच्या बळावर यश मिळाले. उदाहरणार्थ, जेफ बेजोस यांनी नावीन्यपूर्ण विचार करत पुस्तकांची ऑनलाइन विक्री कशी करावी या कल्पनेवर काम केले. आज अॅमेझॉनचे यश संपूर्ण जगासमोर आहे. फास्ट कंपनी या जगातील आघाडीच्या व्यावसायिक मीडिया ब्रँडने जगातील नावीन्यपूर्ण कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली. मीशो, मिल्क मंत्रा, अर्बन कंपनी यांसारख्या नावांचा या यादीत समावेश आहे, ज्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगांनी यश मिळाले आहे.

सामान्यज्ञानाला आव्हान देणारे प्रश्न विचारा
डेल टेक्नॉलॉजीचे सीईओ मायकेल डेल यांनी डेल कंपनी सुरू करण्याचा विचार केला होता. कॉम्प्युटरची किंमत त्याच्या सर्व पार्ट्््सच्या एकूण किमतीपेक्षा पाचपट का आहे, हा प्रश्न होता. मग डेलने सर्व भाग स्वतः एकत्र करून ते विकण्यास सुरुवात केली. पीसीच्या किमतीत घट झाली.

दोन तृतीयांश सर्जनशीलता अनुभवातून शिकता येते संशोधनानुसार एक तृतीयांश सर्जनशीलता आनुवंशिक आहे. दोन तृतीयांश कौशल्ये अनुभवातून शिकता येते. विश्लेषण आणि निरीक्षण कसे करावे, माहित असावे. प्रयोग करताना नेटवर्किंग वाढवण्यासाठी, ओळखीच्या पाच सर्जनशील लोकांना भेटा आणि विचारा की त्यांनी सर्जनशीलता कशी विकसित केली.

प्रवासामुळे नवीन विचारांची व्याप्ती वाढते
मेसन ए. कारपेंटर, विल्यम जेरार्ड सँडर्स या लेखकांच्या संशोधनानुसार, आंतरराष्ट्रीय असाइनमेंटवर काम केलेले सीईआे त्यांच्या कंपनीसाठी सरासरी ७ % अधिक नवनवीन आणि कामगिरी करण्याची जास्त शक्यता असते. पी अँडजीचे सीईआे अॅलन जी. लाफले यांचा अनेक देशांचा अनुभव त्यांच्या यशस्वी सीईआे होण्यात सामील झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...