आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्रामचे नवीन अ‍ॅप:आता इन्स्टाची ट्विटरशी स्पर्धा, जूनअखेरीस टेक्स्ट-बेस्ड अ‍ॅप लाँच करण्याची शक्यता, सध्या टेस्टिंग सुरू

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेटाचे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन मायक्रोब्लॉगिंग टेक्स्ट-आधारित अ‍ॅप आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, इन्स्टाग्रामचे हे नवीन अ‍ॅप जूनच्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकते.

सध्या अ‍ॅपची टेस्टिंग सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या या प्रकल्पाची चाचणी करत आहे. चाचणीसाठी, कंपनीने हे अ‍ॅप गेल्या काही महिन्यांपासून काही निवडक सेलिब्रिटी, इन्फ्लूएन्सर आणि निर्मात्यांना गुप्तपणे दिले आहे.

हे अ‍ॅप इन्स्टाग्रामपेक्षा वेगळे आहे, परंतु यात लोकांना दोन्ही अ‍ॅपची खाती कनेक्ट करता येतील. इन्स्टाग्रामने या प्रोजेक्टला P92 आणि बार्सिलोना असे नाव दिले असल्याचे सांगितले जात आहे.

अ‍ॅप ट्विटर-मास्टोडॉनसारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणार
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिस (UCLA) मध्ये सोशल आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग शिकवणाऱ्या लीह हॅबरमनने अलीकडे अ‍ॅपबद्दलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की हे इन्स्टाग्राम अ‍ॅप ट्विटर आणि मास्टोडॉनसारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करेल.

युझर्स अ‍ॅपमध्ये 500 कॅरेक्टरपर्यंत मजकूर पोस्ट करू शकतील
हॅबरमनने असेही सांगितले की या नवीन अ‍ॅपमध्ये युझर्स 500 कॅरेक्टरपर्यंत मजकूर पोस्ट करू शकतात. याशिवाय, त्यात फोटो, लिंक आणि व्हिडिओदेखील पोस्ट करता येतील. तसेच, हे अ‍ॅप इन्स्टाग्रामशी सहजपणे लिंक केले जाईल, जेणेकरून युझर्सना त्यांच्या विद्यमान फॉलोअर्सशी कनेक्ट होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, या अ‍ॅपबाबत मेटा प्लॅटफॉर्म इंक. यांच्या मालकी असलेल्या Instagram कडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.