आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानात केबिन क्रूसोबत गैरवर्तन करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे विमानन नियामक डीजीसीएने विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना हातळण्यासाठी आणि नियमांनुसार जबाबदारीच्या बाबतीत सर्वच एअरलाइन्सना मार्गदर्शक तत्त्वे जारी केेेली आहेत. सोमवारी जाहीर केलेल्या सूचनांनुसार, विमानात पायलट, केबिन क्रू आणि इतर कर्मचारी/अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. विमानात प्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना कसे हाताळावे, जेणेकरुन विमानाची सुरक्षितात सुनिश्चित होईल, असे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागेल. फेब्रुवारीमध्ये, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहवाल दिला होता की, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत १४३ अनियंत्रित प्रवाशांना प्रतिबंधित केले होते.