आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Insurance Claim Rejection; Top Reasons Your Bike Car Bima Policy Can Be Rejected

विमा पॉलिसीशी संबंधित खास गोष्टी:या कारणांमुळे फेटाळला जाऊ शकतो तुमचा मोटार विमा क्लेम, जाणून घ्या काय आहेत मुख्य कारणे

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर..

अलीकडेच एका मोटारसायकल अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला. विमा कंपनीने त्याच्या कुटुंबीयां दावा फेटाळला. कारण तो 346 सीसीची बाइक होती. अर्थात, पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार, जर बाईकची क्षमता 150 सीसीपेक्षा जास्त असेल, तर कंपनी देय देण्यास जबाबदार नाही.

मिस सेलिंगचेही प्रकरण असू शकते
खरं तर हे मिस सेलिंगचे प्रकरण असू शकते, कारण कंपनीने ग्राहकाला पॉलिसीबद्दल पूर्णपणे माहिती दिली नव्हती. दावे का नाकारले जाऊ शकतात याची इतर अनेक कारणे आहेत, ज्याविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सहसा कार आणि दुचाकी मालक संपूर्ण पॉलिसी दस्तऐवज नीट वाचत नाहीत. त्याच्या फाइन प्रिंटबद्दल ते अनभिज्ञ असतात. त्यांना विमा कंपनीच्या पॉलिसीची माहिती नसते. तुमची विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते किंवा पूर्ण रक्कम देण्यास टाळू शकते, त्यामागील काही कारणे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहेत.

पॉलिसी आणि अ‍ॅड-ऑन कव्हरबद्दल माहितीचा अभाव
दावे नाकारले जाण्याचे आणि लोक तक्रार करण्याचे एक सामान्य कारण हे आहे की काही वस्तू डॅमेज पॉलिसी अंतर्गत समाविष्ट नसतात. यासाठी स्वतंत्र अ‍ॅड-ऑन कव्हर खरेदी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, इंजिनमधील बिघाड किंवा घसारा हानी मूलभूत पॉलिसीमध्ये समाविष्ट नसते. यासाठी तुम्हाला स्वतंत्र इंजिन प्रोटेक्टर आणि झिरो डेप्रिसिएशन अ‍ॅड-ऑन कव्हरची आवश्यकता असते.

कार दुरुस्तीसाठी पाठवणे
स्वतःहून वाहन दुरुस्त करून घेणे ही एक सामान्य चूक आहे. त्यानंतर त्याची माहिती विमा कंपनीला दिली जाते. ही चूक आहे कारण कंपनीला अपघाताचा मागोवा घेणे आणि नंतर दुरुस्ती करणे कठीण होते. यामुळे नुकसानीचे मूल्यांकन करणे आणि दावा मंजूर करणे आणखी कठीण होते. याच कारणामुळे तुम्ही या प्रकरणात विमा कंपनीशी संपर्क साधावा, जेणेकरून ते केवळ नुकसानीचे मूल्यांकन करू शकत नाहीत तर रोड असिस्टन्सदेखील देतात आणि कार त्यांच्या गॅरेजमध्ये घेऊन जातात.

वाहनाचा कमर्शिअल वापर
जर तुम्ही वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी केली असेल परंतु ती व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यास सुरुवात केली असेल, तर अपघात झाल्यास दावा नाकारला जाईल.

खरी माहिती लपवणे किंवा खोटी माहिती देणे
जर पॉलिसी खरेदी करताना खोटे खुलासे किंवा इतर भौतिक तथ्ये उघड केली गेली नाहीत, जसे की नो क्लेम बोनस किंवा मागील नुकसानीचे चुकीचे वर्णन केले असेल, तर दावा नाकारला जाणे निश्चित आहे. त्याचप्रमाणे, दावा दाखल करताना कोणी अपघात किंवा नुकसानीची खोटी माहिती दिली तर विमा नाकारला जाऊ शकतो.

हस्तांतरणात त्रुटी: याचा अर्थ वाहन मालक त्याच्या नावावर नोंदणी आणि विमा हस्तांतरित करण्यात अयशस्वी झाला आहे. अशा परिस्थितीत विम्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

गाड्यांमध्ये अतिरिक्त काम
तुम्ही सीएनजी किट बसवल्यास, अ‍ॅक्सेसरीज जोडल्यास किंवा तुमच्या कारच्या बॉडीमध्ये बदल केल्यास, तुम्हाला त्वरित विमा कंपनीला कळवावे लागेल. अन्यथा अपघात झाल्यास तुमचा दावा स्वीकारला जाणार नाही.

पॉलिसी गाइडलाइन्स
तुम्ही तुमच्या पॉलिसीमधील कलमांच्या मर्यादांचे पालन न केल्यास, दावा नाकारला जाईल. म्हणून, जर तुम्ही निर्दिष्ट भौगोलिक मर्यादेत ( specified geographical limits) वाहन चालवत नसाल किंवा वाहनामध्ये पॉलिसीमध्ये सूचीबद्ध केलेली वैशिष्ट्ये नसतील, जसे की विशिष्ट इंजिनची क्षमता, तर दावा नाकारला जाण्याची शक्यता असते.

ड्रायव्हिंग लायसन्स नसणे
अपघाताच्या वेळी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीकडे परवाना नसेल, तर दावा नाकारला जाईल. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे ज्याची मुदत संपलेली नाही. ज्या वाहनासाठी परवाना जारी करण्यात आला होता तेच वाहन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना असेल परंतु कार चालवताना अपघात झाला तर दावा नाकारला जाईल.

दारुच्या नशेत गाडी चालवणे
दावा नाकारण्याचे आणखी एक स्पष्ट कारण म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे. भारतात दारु पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे, दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातामुळे होणारा कोणताही दावा नाकारला जाईल. जर तुम्ही विमा कंपनीला अपघाताची माहिती दिली नाही, तर तुमचा दावा नाकारला जाण्याची दाट शक्यता असते. यासाठी तुम्ही साधारणपणे 24-48 तासांच्या आत हे सुनिश्चित केले पाहिजे की या वेळेत तुम्ही विमा कंपनीला अपघाताची माहिती द्याल.

पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास विलंब
जर तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास विसरलात आणि यादरम्यान एखादी दुर्घटना घडली तर विमा कंपनीकडून दावा स्वीकारला जाणार नाही.

काय कव्हर होणार नाही
मूलभूत विमा पॉलिसी केवळ बॉडी आणि इंजिनला झआलेले आकस्मिक नुकसान कव्हर करते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या गोष्टी सहसा वीम्यात कव्हर केल्या जात नाहीत.

घसारा (depreciation) मुळे होणारे नुकसान
पावसाळ्यात हायड्रोस्टॅटिक नुकसानीमुळे इंजिन खराब होणे सामान्य आहे. येथे नुकसान पूर किंवा पावसामुळे झालेले नाही, तर एखाद्याने पाणी साचलेल्या भागात कार चालवल्यामुळे झाले आहे. अर्थात हे विमा कंपनी कव्हर करणार नाही.

यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल ब्रेकडाउन
मोटार विमा पॉलिसी कोणत्याही यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल समस्या कव्हर करत नाहीत. इंजिन ऑइल किंवा ल्युब्रिकेंट यांसारख्या वस्तू मूलभूत पॉलिसीमध्ये समाविष्ट नसतात आणि कोणतेही प्लास्टिकचे भाग किंवा टायरचाही त्यात समावेश होते नाही. सामान्य वापरादरम्यान वाहनाला झालेले कोणतेही नुकसान, जसे की खराब झालेले टायर किंवा ट्यूब कव्हर केले जात नाही.

चावी किंवा लॉक बदलणे
सध्याच्या काळात कारमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत चावी आणि कीलेस लॉकिंग सिस्टमसह येतात, ज्या बदलणे महाग असू शकते. तुमच्याकडे अ‍ॅड-ऑन कव्हर असेल तरच ते कव्हर केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...