आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आरोग्य, प्रवास, अपघात यावरील विमा संरक्षणाविषयी तुम्ही ऐकले असेलच. परंतु तुम्हाला क्वचितच माहिती असेल की, एलियन, व्हँपायर आणि लग्नाच्या आधी नवरी पळून जाण्यावर देखील इंश्योरेंस मिळतो. होय! अशा बर्याच विमा कंपन्या आहेत ज्या विशेषत: अशा कव्हर योजना ऑफर करतात ज्याची आपल्याला माहिती नसते. चला तर मग आपण अशाच काही इंट्रेस्टिंग विमा प्लानविषयी जाणून घेऊया...
नवरी पळाल्यास इंश्योरेंस
खूप कमी लोकांना माहिती असेल की, लग्नापूर्वीच जर नवरी किंवा नवरदेव पळून गेला तर यासाठी अनेक कंपन्यांकडून तुम्ही इंश्योरेंस कव्हर घेऊ शकता. या पॉलिसीनुसार तुम्ही लग्नाच्या सजावटीसाठी किंवा इतर खर्चासाठी विमा कंपन्यांना दावा करु शकता. यामध्ये जेवणाचाही समावेश आहे. विमा कंपन्या या खर्चाचा क्लेम देतात.
जाणून घ्या काय आहे वेडिंग इंश्योरेंस पॉलिसी
लग्नासाठी इंश्योरेंस कंपन्या अनेक प्रकारच्या पॉलिसी तयार ठेवतात. तुमच्या गरजेनुसार पॅकेज तयार राहते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही पॅकेज निवडू शकता.
वेडिंग इंश्योरेंसची गरज का आहे?
लग्न कँसल होणे, तुमचे दागिणे चोरी होणे किंवा लग्नानंतर अचानक अॅक्सीडेंट होणे किंवा लग्न अडकणे. अशा अनेक समस्यांसाठी वेडिंग इंश्योरेंस तुमची मदत आणि सुरक्षा करेल. एका चांगल्या विमा पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नुकसानीची भरपाई करु शकता.
कोणत्या गोष्टींचे असते इंश्योरेंस
लग्नासाठी बुक केलेला एखादा हॉल किंवा रिसॉर्टच्या अडवान्स पैशांचे इंश्योरेंस असते. ट्रॅव्हल एजेंसीला दिलेले एडवान्स पेमेंट, हॉटेलची एडवान्स बुकिंग, लग्नाच्या कार्डचे पेमेंट, लग्नाच्या वेन्यू सेटपासून इतर सजावट आणि म्यूझिकसाठी इंश्योरेंस असते.
एलियनद्वारे अपहरणावर विमा प्लान
एलियनद्वारे अपहरणावर इंश्योरेंस मिळते. अशा प्रकारच्या विमा देणाऱ्या पहिल्या कंपनीचे मुख्यालय फ्लोरिडामध्ये आहे. ज्या कंपनीचे नाव सेंट लॉरेंस एजेंसी आहे. तेव्हापासून असा अंदाज आहे की जगभरातील 20 हजाराहून अधिक लोकांनी हा विमा निवडला आहे. असे दिसते की लोकांमध्ये एलियनची भीती खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यांनी हा विमा घेतला आहे.
व्हँपायर टाळण्यासाठी विमा द्या
पुष्कळ लोक व्हँपायर असल्याचे आणि त्यांच्या भीतीवर विश्वास ठेवतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये भीती भयानक वाटू शकते, परंतु लंडनमधील Lloyds या विमा कंपनीने लोकांसाठी अशी पॉलिसी कस्टमाइज्ड केली आहे. एवढेच नाही तर भूत-प्रेतावर जगात बर्याच ठिकाणी विश्वास ठेवला जातो. यासंदर्भात जोखीम लक्षात घेता असे तपास करणार्या कायदेशीर पॅरा नॉर्मल सोसायट्यांनी विमा कंपन्यांशी व्यावसायिक कव्हरेज देण्यासाठी करार केले आहेत.
कोण बनेगा करोडपतीवर विमा कव्हर असते
तुम्हाला माहिती आहे की, कोण बनेगा करोडपतीमध्ये मिळणारी बक्षिस रक्कम शोचे निर्माता नाही, तर विमा कंपन्या वितरित करतात. यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती कोट्यावधींची राशी जिंकतो. तेव्हा विमाकर्ता जबाबदार असतो. आपण आपल्या मौल्यवान मालमत्तेचा विमा घेऊ इच्छित असल्यास आपण घेऊ शकता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.