आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Insurance Scheme : In The PM Vima Suraksha Yojana, You Get Insurance Of 2 Lakh Rupees For Just 1 Rupees A Month, You And Your Family Get Financial Help In Bad Times.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्सनल फायनन्स:पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेत केवळ 1 रुपया महिन्यात मिळतो 2 लाख रुपयांचा विमा, वाईट काळात तुम्हाला आणि तुमच्या परिवाला मिळते आर्थिक मदत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 ते 70 वयोगटातील कोणीतीही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते
  • या योजनेची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली होती.

सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक विमा योजना चालवित आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना त्यातीलच एक आहे. या योजनेअंतर्गत केवळ 1 रुपया महिन्यात 2 लाख पर्यंतचा मृत्यू विमा दिला जातो. ही रक्कम आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यातून दरमहा वजा केली जाते. या अंतर्गत 2 लाख रुपयांचे कवच मिळते तर वेगवेगळ्या परिस्थितीत एक लाख रुपये मिळतात. 2015 मध्ये या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. आम्ही आपल्याला या योजनेबद्दल सांगत आहोत.

अपघातात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात

योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. तसेच अपघातात कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व असल्यास (उदा. दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय) 2 लाख रुपये दिले जातात. अपघातात स्थायी अपंगत्व (उदा. एक डोळा, एक हात, एका पाय गमावल्यास) आल्यास 1 लाख रुपये दिले जातात.

आपण या योजनेचा लाभ कोणत्याही बँकेतून घेऊ शकता

आपण पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म (पीएमएसबीवाय) ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन भरू शकता. आपण कोणत्याही बँकेद्वारे हा विमा घेऊ शकता. सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खासगी बँकांनीही आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. थेट बँक खात्यातून पैसे डेबिट केले जातात. यासह, या योजनेशी संलग्न केलेला फॉर्म http://www.dif.mp.gov.in/pmjsby.html वरून डाउनलोड करुन बँकेत जमा केला जाऊ शकतो. हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगली, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

18 ते 70 वयोगटातील कोणीतीही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते

जेथे तुमचे बचत खाते आहे अशा बँकेत हा फॉर्म जमा करा. प्रीमियमची रक्कम तुमच्या बँ खात्यातूनच वजा केली जाईल यासाठी तुम्हाला फॉर्मवर मान्यता द्यावी लागेल. बँक प्रत्येक वर्षी 1 जूनला आपल्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप वजा करतील. 18 ते 70 वयोगटातील कोणीतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

14 कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत?

सुमारे 14 कोटी लोक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार दर आठवड्याला सुमारे दीड लाख लोक या योजनेत सामील होत आहेत.