आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Interest Rate: Goverment Cuts Interest Rates On Saving Up To 1.1%; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पबचतीचे अच्छे दिन संपले:बचत योजनांवरील व्याजदरांत सरकारची 1.1% पर्यंत कपात; ज्येष्ठांच्या बचत, सुकन्या समृद्धी योजनेलाही कात्री

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हीपीएफ, एनपीएस, म्युच्युअल फंडांकडे लक्ष द्या

पीपीएफ व राष्ट्रीय बचत पत्रासारख्या योजनांत अल्पबचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने मोठा झटका दिला. वित्त मंत्रालयाने १ एप्रिलपासूनच्या नव्या तिमाहीसाठी व्याजदरांत बुधवारी मोठी कपात केली. सर्वाधिक १.१% कपात एका वर्षाच्या मुदत ठेवींवर झाली. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (पीपीएफ) ७० तर राष्ट्रीय बचत पत्रात ९० बेसिस पॉइंटची कपात झाली. बचत खात्यावरील व्याजदरात ०.५% कपात करण्यात आली आहे.

व्हीपीएफ, एनपीएस, म्युच्युअल फंडांकडे लक्ष द्या
निवृत्तीची योजना वा दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ततेसाठी पीपीएफ आदी आताही सर्वाेत्तम पर्याय आहेत. व्हीपीएफ, एनपीएस व म्युच्युअल फंडवरही लक्ष द्या. दरांत वाढ-कपात होत राहील. आरबीआयच्या डेटानुसार, अल्पबचत योजनांत १९ मार्च २०२१ पर्यंत १०.४६ लाख कोटी रुपये होते, ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुमारे ५% इतके आहेत. त्यात मासिक उत्पन्न योजनेत 2 लाख कोटी रुपये आहेत. तुम्हाला 6.4% पेक्षा जास्त कमावायचे असतील तर विविध जागी गुंतवणूक करा. म्हणजे, विविध पर्यायांतून जास्त सरासरी परतावा मिळेल. जानेवारीत महागाई 4% होती, म्हणजे आताही या योजना महागाई दरापेक्षा जास्त व्याज देत आहेत. काही वर्षांपूर्वी महागाई अनेक तिमाहींत 5% हून कमी होती. त्या वेळी या योजना 8% पेक्षा जास्त व्याज देत होत्या. आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाजार.कॉम

बातम्या आणखी आहेत...